विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याकडे आहे तब्बल इतकी संपत्ती, भारतासह लंडन…
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. भारतीय संघासोबत भारतामध्ये परतल्यानतंर लगेचच विराट कोहली हा लंडनला रवाना झाला. यावेळी काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आता विराट कुटुंबियांसोबत खास वेळ घालवत आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कायमच चर्चेत असतात. T20 वर्ल्डकपमध्ये धमाकेदार खेळताना विराट कोहली हा दिसला. भारतीय संघासोबत विराट कोहली हा भारतामध्ये पोहोचला. मात्र, त्यानंतर लगेचच तो लंडनला रवाना झाला. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सध्या कुटुंबासोबत लंडनमध्ये राहत आहेत. हेच नाहीतर अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच लंडनमध्येच मुलाला जन्म दिला. यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आणि विराट- अनुष्काने त्यांच्या मुलाच्या नावाची घोषणा केली. अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवलंय.
गेल्या काही वर्षांपासून अनुष्का शर्मा ही चित्रपटांपासून दूर आहे. 2018 मध्ये शेवटी अनुष्का शर्मा ही झिरो या चित्रपटात दिसली होती. मात्र, अनुष्का शर्मा हिचा हा चित्रपट फ्लॉप गेला. मात्र, अभिनयापासून दूर असताना देखील अनुष्का शर्मा ही कोट्यवधीची कमाई करते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे अत्यंत मोठ्या संपत्तीचे मालक आहेत.
अनुष्का शर्मा आज जरी अभिनय करत नसेल तरीही ती मोठा पैसा कमावते. जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्टसाठी मोठी फीस अनुष्का शर्मा घेते. दुसरीकडे विराट कोहली हा क्रिकेट, जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तगडी कमाई करतो. रिपोर्टनुसार अनुष्का शर्माची एकून संपत्ती ही 1300 कोटी आहे. त्यापैकी विराट कोहली याची संपत्ती 1050 कोटी आहे.
विराट कोहली याला बीसीसीआयकडून एका वर्षाला सात कोटी मिळतात. शिवाय प्रत्येक सामन्यासाठी देखील त्याला वेगवेगळे मानधन मिळते. जसे की, कसोटी सामन्यासाठी 15 लाख एक दिवसीय सामन्यासाठी 6 लाख यासोबतच विराट कोहली याला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून 15 कोटी रुपये मिळतात. शिवाय जाहिराती आणि इंस्टाग्राम पोस्टसाठी विराट कोहली 8.9 कोटी घेतो. अनुष्का शर्मा हिची एकून संपत्ती ही 255 कोटी आहे.
अनुष्का शर्मा ही एका चित्रपटासाठी 7 कोटी फीस घेते. जाहिरातीसाठी अनुष्का 5 से 10 कोटी घेते. अनुष्का शर्मा ही इंस्टाग्राम पोस्टसाठी 95 लाख रूपये फीस घेते. भारतासह विदेशात आणि लंडनमध्येही अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची संपत्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे की, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कायमच विदेशात शिफ्ट होणार आहेत. मात्र, यावर दोघांनीही काहीही अजून भाष्य केले नाहीये.