ट्विटरवर शाहरुख खान विरोधात विराट कोहली; दोन्ही सेलिब्रिटींचे चाहते भिडले, नेमकं काय आहे प्रकरण?

शाहरुख खान हा बॉलिवूडमधल्या सर्वांत मोठ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याचा चाहतावर्ग केवळ देशातच नाही तर जगभरात आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पठाण' या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले.

ट्विटरवर शाहरुख खान विरोधात विराट कोहली; दोन्ही सेलिब्रिटींचे चाहते भिडले, नेमकं काय आहे प्रकरण?
Virat Kohli and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 9:59 AM

मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान आणि क्रिकेटच्या मैदानावरील ‘किंग’ विराट कोहली यांच्यातील नातं जरी मैत्रीचं असलं तरी सध्या या दोघांचे चाहते एकमेकांशी भिडले आहेत. जवळपास गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर शाहरुख आणि विराटचे चाहते एकमेकांविरोधात ट्विट करत आहेत. कोणता सेलिब्रिटी सर्वोत्कृष्ट आहे, हे सिद्ध करण्यासाठी दोघांच्या चाहत्यांमध्ये चुरस रंगली आहे. कोणी शाहरुखच्या अभिनयाचं आणि जगभरात प्रसिद्ध असल्याचं म्हणतंय. तर कोणी विराट कोहलीच्या स्टारडम आणि इन्स्टाग्राम फॉलोअर्सचं उदाहरण देत त्याला शाहरुखपेक्षा मोठं म्हटलं जातंय. ट्विटरवर सुरू असलेल्या या ट्रेंडमध्ये काही चाहते वादग्रस्त ट्विटसुद्धा करत आहेत.

ट्विटरवर सुरू असलेल्या या वादादरम्यान काही लोक शांतीचं आवाहन करत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही. विराट कोहली आणि शाहरुख खान दोघंही या देशाचा अभिमान आहेत. हे दोघं आपल्या देशाचं जगभरात प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे या क्षुल्लक वादाला इथेच थांबवा.’

हे सुद्धा वाचा

शाहरुख खानच्या चाहत्याने लिहिलं, ‘शाहरुखची तुलना इतरांशी का केली जाते? शाहरुख विरोधात साऊथचे कलाकार, शाहरुखविरोधात राजकारणी, शाहरुख विरोधात क्रिकेटर्स. कारण सर्वांना माहितीये की तो सर्वोत्कृष्ट आहे.’ दुसरीकडे विराटच्या चाहत्याने लिहिलं, ‘शाहरुखचा सर्वाधिक लाइक केलेला ट्विट हा विराट कोहलीसंदर्भातील होता. त्यामुळे विराटच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.’

शाहरुख खान हा बॉलिवूडमधल्या सर्वांत मोठ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याचा चाहतावर्ग केवळ देशातच नाही तर जगभरात आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले. बॉलिवूडमधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने देशभरात 500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. केवळ चित्रपटामुळेच नाही तर शाहरुख नेहमीच त्याच्या विनम्र स्वभावामुळेही ओळखला जातो. मन्नत बाहेर जमलेली चाहत्यांची गर्दी असो किंवा मग पापाराझी.. शाहरुख नेहमीच त्यांच्याशी प्रेमळपणे वागताना दिसतो.

विराट कोहलीसुद्धा देशातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर्सपैकी एक आहे. टेस्ट मॅच, वनडे आणि टी 20 मध्ये त्याने आतापर्यंत 71 शतक झळकावले आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल 24.2 कोटी फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावरील तो मोठा स्टार आहे.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.