Anushka Virat | शोनू, बाबू, जानू, माय लव्ह, स्वीटहार्ट… नव्हे तर चक्क ‘या’ नावाने अनुष्का शर्माच्या फोनमध्ये विराटचा नंबर सेव्ह
बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये हेल्मेट न घालता फिरल्यामुळे अनुष्का शर्मा हिला मुंबई पोलिसांनी दंड लावला होता. अनुष्का शर्मा हिचा गाडीवर हेल्मेट न घालता फिरतानाचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला होता.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) यांच्या जोडीला प्रेक्षकांचे जबरदस्त असे प्रेम मिळताना कायमच दिसते. विराट कोहली याच्या मॅचला नेहमीच अनुष्का शर्मा ही उपस्थित असते. इतकेच नाही तर मैदानामध्ये पतीला सपोर्ट करताना देखील अनुष्का शर्मा ही दिसते. विराट कोहली याच्यासोबत लग्न झाल्यापासून अनुष्का शर्मा ही बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांपासून दूर आहे. शाहरूख खान याच्या चित्रपटातून अनुष्का शर्मा हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची एक मुलगी देखील आहे. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली यांनी त्यांच्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे.
अनेकदा विराट कोहली हा अनुष्का शर्मा हिच्यासोबत मंदिरांमध्ये दिसतो. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर बघायला मिळतील. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी बेंगलुरुमधील एका स्पोर्ट्सच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना अनेक प्रश्न हे विचारण्यात आले.
या कार्यक्रमात धमाल करताना अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दिसले. या दरम्यान अनुष्का शर्मा हिला विचारण्यात आले की, तू पती विराट याचा नंबर कोणत्या नावाने मोबाईलमध्ये सेव्ह केला आहे. विशेष म्हणजे अहो, ओजी, डॉर्लिंग, जान, माय लव्ह अशा कोणत्याच नावाने अनुष्का शर्मा हिने विराट कोहली याचा नंबर सेव्ह केला नाहीये.
अनुष्का शर्मा हिने थेट विराट कोहली याचा नंबर पती परमेश्वर नावाने सेव्ह केल्याचा मोठा खुलासा हा अनुष्काने केला आहे. अनुष्का शर्मा हिचे हे उत्तर ऐकून सर्वांनाच एक मोठा धक्का बसला. मात्र, या कार्यक्रमात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे अनेक प्रश्नांची उत्तरे चुकीची देताना देखील दिसले. आता हाच सेम प्रश्न विराटला देखील विचारण्यात आला.
यावर विराट कोहली म्हणाला की, मी अनुष्काचा नंबर हा डॉर्लिंग म्हणून सेव्ह केलाय. मात्र, मी तुम्हाला इथे खरे का सांगू असे म्हणताना देखील विराट कोहली हा दिसला आहे. मात्र, अनुष्का शर्मा हिने खरोखरच विराट कोहली याचा नंबर पती परमेश्वर नावाने सेव्ह केलाय का? यावर जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. आता याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.