Anushka Sakshi Friendship | अनुष्का शर्मा आणि धोनीची पत्नी साक्षी ‘या’ आहेत बालपणीच्या खास मैत्रिणी, शाळेतील दोघींचे फोटो व्हायरल
विराट कोहली याची पत्नी आणि बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ही मुंबईच्या रस्त्यावर गाडीवर फिरताना दिसली होती.
मुंबई : कालच आयपीएलचे फायनल झाले. या सामन्यात चेन्नईने गुजरातला हरवले. अजूनही प्रेक्षकांमध्ये या मॅचबद्दलची चर्चा दिसत आहे. या मॅचमध्ये महेंद्र सिंह धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षी स्टेडियमवर उपस्थित होती. नेहमीच क्रिकेटरच्या पत्नी त्यांना सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहचतात. विराट कोहली (Virat Kohli) याची पत्नी आणि बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील कायमच विराट कोहली याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसते. मात्र, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, अनुष्का शर्मा आणि साक्षी सिंह या लहानपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत. इतकेच नाही तर एकाच शाळेत त्यांचे शिक्षण (Education) देखील झाले आहे.
सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि साक्षी यांचे जुने काही फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा आणि साक्षी या दिसत आहेत. या फोटोवरून हे स्पष्ट दिसत आहे की, हे फोटो फार जुने नक्कीच आहेत. यातील एका फोटोमध्ये तर अनुष्का शर्मा आणि साक्षी या फार लहान दिसत आहेत.
अनुष्का शर्माचे वडील निवृत्त कर्नल अजय कुमार शर्मा हे आसाममध्ये तैनात असताना त्यांनी अनुष्का शर्मा हिला सेंट मेरी स्कूलमध्ये टाकले होते. विशेष म्हणजे याच शाळेत साक्षी देखील होती. जो एक फोटो व्हायरल होत आहे तो याच शाळेतील साक्षी आणि अनुष्का यांचा आहे. 2008 मध्ये अनुष्का शर्मा हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.
शाहरूख खान याच्यासोबत पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी ही अनुष्का शर्मा हिला मिळाली. रब ने बना दी जोडी या चित्रपटानंतर अनुष्का शर्मा हिने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. 2017 मध्ये अनुष्का शर्मा हिने विराट कोहली याच्यासोबत लग्न केले. मात्र, लग्नानंतर अनुष्का शर्मा ही चित्रपटांमध्ये दिसत नाहीये.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची एक मुलगी देखील असून तिचे नाव वामिका ठेवले आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांची मुलीची एकही झलक ही चाहत्यांना दाखवली नाहीये. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा ही मुंबईत गाडीवर फिरताना दिसली होती. मात्र, हेल्मेट घातले नसल्यामुळे अनुष्का शर्मा हिला दंड आकारण्यात आला. अनुष्का शर्मा हिचा तो व्हिडीओ खूप जास्त व्हायरल झाला होता.