रितेशच्या भाऊच्या धक्क्यावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नाराज? केला संतप्त सवाल

'बिग बॉस मराठी 5'चा सूत्रसंचालक रितेश देशमुखवर प्रेक्षक नाराज झाले आहेत. निक्की तांबोळीला काहीच बोललं जात नाही, अशी अनेकांची तक्रार आहे. आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनेही पोस्ट लिहित नाराजी बोलून दाखवली आहे.

रितेशच्या भाऊच्या धक्क्यावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नाराज? केला संतप्त सवाल
Nikki Tamboli and Riteish DeshmukhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 10:25 AM

‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातील निक्की तांबोळीमुळे घराबाहेरही बरेच वाद होताना पहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुखने निक्कीची बाजू घेतली आणि बी टीमला सुनावलं. यावरून प्रेक्षकांची तर नाराजी झालीच आहे. पण आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनेही यावरून संतप्त सवाल केला आहे. फक्त बी टीमला का धारेवर धरलं जातं, असा प्रश्न तिने सोशल मीडियावर केला आहे. ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडनंतर अभिनेत्री विशाखा सुभेदारने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्टच लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने निक्कीलाही चांगलंच सुनावलं आहे.

विशाखा सुभेदारची पोस्ट-

‘काल निक्की सोडून सगळेच चुकले. जे जे दिसलं त्यात सगळेच चुकीचे दिसले. अरबाजने प्यादं केलं उरलेल्या लोकांचं. मान्य चुकलंच. त्याच्यावर (अरबाज + निक्की) तुमचा गेम नकोच असायला. अरबाज आणि निक्की त्यांची त्यांची खेळी खेळत आहेत, तुम्ही तुमचं खेळा. आता धक्का बी टीमलाच आणि आम्हा प्रेक्षकांनासुद्धा. निक्कीने डबा फोडला. तिच्या ट्रॉमामुळे ती अंधारात गेली नाही. हा तिचा गेम होता. मग अभिजीतला त्याक्षणी टीम बीने सपोर्ट न करणं हा त्यांचा गेम असू शकत नाही? जेणेकरून निक्कीला आत जावंच लागेल. वैयक्तिक गेम आणि टीम स्पिरीटचा गेम आहे. घेतला एकत्र निर्णय. मग त्यांना मैत्रीचे का ढाचे आणि नियम असूनही ती सपोर्ट करत नाही, तिला काहीच बोललं गेलं नाही? का आणि ऑप्शन का दिला गेला? नियम म्हणून घरभर फिरायचं आणि टास्क करताना दुसरा गडी वापरायचं? फक्त बी टीमला का धारेवर धरलं जातं?

हे सुद्धा वाचा

आता जरा निक्कीबद्दल.. या बाई.. निक्कीची चिक्की म्हणजे वाइल्ड कार्ड एण्ट्री.. आणि हा (मी जो पोस्ट करतेय तो) व्हिडीओ पाहिला मी आणि असं वाटलं की ही घरून ठरवूनच आलीय, एक हँडसम बिग बॉसने घरात तिच्यासाठी आणायचा (माझ्यासाठीच फक्त इति निक्की) आणि ती प्रेमाचे रंग उधळणार आणि त्याच्या बळाचा ही फायदा घेणार आणि आपण प्रेक्षक हे चाळे पाहणार. अरे हे काय आहे? किती स्वार्थी असावं? अप्पलपोटी, ढालगज आणि तिचं हे ज्ञान अभिजीत निमूट ऐकून कसं घेतो? ही निक्कीची सो कॉल्ड स्ट्रॅटर्जी? याआधी हे एकमेकांत गुंतणं आम्ही पाहिलंय (पण ते ठरवून नाही वाटलं, नंतर नंतर ते कळलंच). पण हे अग्रेशन खरं खोटं देवास ठाऊक आणि बाईच्या मिठीत स्वर्ग सारा हे सांगणारा प्रवचन या सिझनमध्येच ऐकला, पाहिला. अरबाज वैभव भिडले नाहीत. तशी निक्की आणि जान्हवी पण भिडले नाहीत. ती निक्की तर घाबरते जान्हवीला असं मला वाटतं. कारण ती तिच्यासमोर उतरत नाही. तिला उलट बोलत नाही आणि वैभव पण घाबरतो अरबाजला.

रितेशने निक्कीला काहीच सुनावलं नाही, म्हणून प्रेक्षकही नाराज झाले आहेत. ‘लोकांच्या नजरेत निक्कीची प्रतिमा चांगली बनवण्यासाठी बिग बॉस खूप मनापासून प्रयत्न करत आहे,’ असं एकाने लिहिलंय. तर ‘आम्हाला वाटतं भाऊचा धक्का म्हणजे आज जे चुकीचे वागलेत त्यांची शाळा घेणार. पण आज समजलं की निक्कीचं सगळं बरोबर असतं आणि बाकीच्यांचं चुकीच दाखवायचं. यासाठीच भाऊचा धक्का असतो,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘निक्कीसाठी बिग बॉस बनवलाय का’, असाही सवाल युजर्सनी केला आहे.

मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.