Vivek Agnihotri | ‘तुम्ही साधूसारखे…’, भारतीय लग्नांबद्दल विवेक अग्निहोत्री यांचं मोठं वक्यव्य; नेटकरी संतापले

| Updated on: May 17, 2023 | 1:17 PM

'भारतीय लग्नांमध्ये लाल रंग...' विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटवर संतापले नेटकरी.. म्हणाले, 'तुम्ही साधूसारखे...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक अग्निहोत्री यांच्या लग्नाची चर्चा...

Vivek Agnihotri | तुम्ही साधूसारखे..., भारतीय लग्नांबद्दल विवेक अग्निहोत्री यांचं मोठं वक्यव्य; नेटकरी संतापले
Follow us on

मुंबई : भारतीय लग्नांमध्ये नवरी लाल रंगाचे कपडे घालते... असा समज आहे. पण आता प्रत्येक जण आपल्या लग्नासाठी वेगळ्या रंगाची निवड करतो. बॉलिवूडमध्ये देखील आतापर्यंत जेवढ्या अभिनेत्रींनी लग्न केलं, त्यांनी लाल रंगाचे कपडे न घालता ऑफ व्हाईट किंवा अन्य रंगाचा लेहंगा घातला होता. नुकताच परिणीती चोप्रा हिने देखील साखरपुडा केला.. परिणीती हिने देखील लाल रंगाचे कपडे घातले नाहीत. अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्यात ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस घातला होता. दरम्यान ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लग्नात घालण्यात येणाऱ्या कपड्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.. ज्यावर अनेक नेटकऱ्यांनी संताप देखील व्यक्त केला. सध्या सर्वत्र विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटची चर्चा आहे…

विवेक अग्निहोत्री ट्विट करत म्हणाले, ‘भारतीय लग्नांमध्ये आता लाल रंग गायब झाला आहे? का गायब झाला आहे? कोणाचा परिणाम आहे? लग्नाचे कपडे देखील आता Culture Fluid झाले आहेत?’ विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे…

हे सुद्धा वाचा

 

 

विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘संस्कतीची गोष्ट आहे तर सर तुम्ही साधूसारखे कपडे घालायला हवेत. तुम्ही का सुट बूट घालून फिरता…?’ अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘गावात आजही परंपरिक विवाहात नवली लाल रंगाचे कपडे घालते. सेलिब्रिटी फक्त लाल रंगाच्या कपड्यांमध्ये लग्न करत नाहीत.. त्यांना कदाचित लाल रंगाची एलर्जी असावी…’

 

 

दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत ‘लोक फक्त फोटोशूटसाठी लग्न करतात..’ असं म्हणाले होते. ‘लोक फक्त आणि फक्त लग्नाचे फोटो, व्हिडीओ, देखाव्यासाठी आणि डेस्टिनेशल वेडिंगचा टॅग मिळवण्यासाठी लग्न करतात. एका वेडिंग प्लानरने मला सांगितलं की, लग्न ठिकाणी पोहचण्यासाठी फोटोग्राफरला उशीर झाल्यामुळे नवरी बेशुद्ध झाली…’ या ट्विटनंतर देखील विवेक अग्निहोत्री यांना ट्रोल करण्यात आलं होतं…