‘पठाण’ला विरोध करणं सेलिब्रिटीला पडला महागात, मुलीबद्दल अपशब्द वापरत युजर्स म्हणाले…
'बेशर्म रंग' गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकीनीमूळे वातावरण तापलं; प्रसिद्ध सेलिब्रिटीची लेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर
मुंबई : ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सर्वत्र ‘बेशर्म रंग’ गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे वातावरण तापलं आहे. सर्वच स्तरातून सिनेमाला विरोध होत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांना ‘पठाण’ सिनेमाला विरोध करणं महागात पडलं आहे. विवेक अग्नीहोत्री यांना जीवे मारण्याची धमकी मिळत असून त्यांच्या मुलीबद्दल देखील युजर्सने अपशब्दांचा वापर केला आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी काही स्क्रिनशॉर्ट ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. अग्निहोत्री यांनी शेअर केलेल्या स्क्रिनशॉर्टमध्ये एका व्यक्तीने लिहिलं आहे की, ‘मी तुला शोधत आहे, तुझ्या घरात घुसून तुला मारेल…’, तर अन्य एका व्यक्तीने अग्निहोत्री यांच्या मुलीवर निशाणा साधला, ‘तुझी मुलगी असं करत असेल तर ठिक आणि कोणी दुसरं करत असेल तर वाईट…’ सध्या अग्निहोत्री यांनी शेअर केलेले स्क्रिनशॉर्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
Badshah was right. There is negativity on social media. (But we are positive). pic.twitter.com/1tU6cTGsnx
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) December 31, 2022
विवेक अग्निहोत्री यांनी ‘बेशर्म रंग’ गाण्यावर केली टीका दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर अश्लिलता पसरवण्याचा आरोप केले होते. सोबतच त्यांनी ट्विट करत, ‘धर्मनिरपेक्ष लोकांनी या गोष्टी पाहू नका…’ या ट्विटमुळे अग्निहोत्री यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर लोकांच्या निशाण्यावर आला. गाण्यात दीपिकाने घातलेली भगव्या रंगाची बिकीनी वादाचं कारण ठरली. भारतात दीपिकाने गाण्यात घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीला कडाडून विरोध करण्यात झाला. अनेक राजकीय प्रतिक्रियांनी देखील वातावरण तापलं.
दीपिका आणि शाहरुख स्टारर ‘पठाण’ सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘पठाण’ सिनेमातून शाहरुख तब्बल चार वर्षांनी पुन्हा पदार्पण करणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमात दीपिका आणि शाहरुख सोबतच अभिनेता जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.