विवेक अग्निहोत्री यांचा शाहरुख खानवर अत्यंत गंभीर आरोप, चाहते हैराण, थेट म्हणाले, उध्वस्त केले आणि
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असणारा अभिनेता आहे. इतकेच नाही तर शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. शाहरुख खान हा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतो.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Vivek Agnihotri) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्यासाठी 2023 चे वर्षे अत्यंत लकी ठरले आहे. यंदाच शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचा सुरूवातीला पठाण हा चित्रपट (Movie) रिलीज झाला आणि या चित्रपटाने मोठा धमाका केला. विशेष म्हणजे चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत थेट 100 कोटींचे पहिल्याच दिवशी जगभरातून कलेक्शन केले. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ही सातत्याने सोशल मीडियावर केली जात होती. मात्र, असे असतानाही चित्रपटाने तूफान अशी कामगिरी ही नक्कीच केलीये. विशेष म्हणजे पठाण या चित्रपटाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करताना शाहरुख खान हा दिसला होता.
आता नुकताच शाहरुख खान याच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य करताना विवेक अग्निहोत्री हे दिसले आहेत. विवेक अग्निहोत्री हे म्हणाले की, मी शाहरुख खान याचा मोठा चाहता नक्कीच आहे. मात्र, शाहरुख खान याला मी बॉलिवूड इंडस्ट्रीला उद्ध्वस्त करण्यासाठी जबाबदार मानतो, हे विवेक अग्निहोत्री यांचे बोलणे ऐकून अनेकजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले.
विवेक अग्निहोत्री यांनी पुढे करण जोहर याच्यावर देखील निशाणा साधला आहे. करण जोहर याचे चित्रपट मला आवडतात. मात्र, करण जोहर याचे बाॅलिवूडमध्ये सुरू असलेले राजकारण हे मला मुळीच आवडत नाही. बॉलिवूडमध्ये तुम्ही ज्या प्रकारचे राजकारण करता त्याचे उद्देश नक्कीच चुकीचे आहेत, असे माझे मत आहे.
मुळात म्हणजे फक्त स्टारडम किंवा स्टार सिस्टीमची प्रगती केवळ हेच करण जोहर याच्याकडून केले जाते, जे चुकीचे आहे. ज्याच्या मी वैयक्तिकरित्या विरोधात आहे, असेही म्हणताना विवेक अग्निहोत्री हे दिसले आहेत. विवेक अग्निहोत्री यांचा द वॅक्सीन वॉर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
विवेक अग्निहोत्री हे नेहमीच सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसतात. अनेक विषयांवर आपले मत मांडताना विवेक अग्निहोत्री हे दिसतात. मात्र, अनेकदा विवेक अग्निहोत्री यांच्यावर टिका देखील केली जाते. विवेक अग्निहोत्री आणि प्रकाश राज यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर वाद झाल्याचे देखील बघायला मिळाले होते. द कश्मीर स्टोरी चित्रपटावर टिका करताना प्रकाश राज दिसले होते.