‘कोणीही भारताचं नाव…’, दीपिका पादुकोण हिच्याबद्दल असं का म्हणाले विवेक अग्निहोत्री?

भारताचा उल्लेख करत दीपिका पादुकोण हिच्याबद्दल विवेक अग्निहोत्री म्हणाले...; सध्या सर्वत्र त्यांच्या स्पष्ट भूमिकेचीच चर्चा... 'पठाण' सिनेमानंतर दीपिकावर टीका करणारे विवेक पुन्हा चर्चेत

'कोणीही भारताचं नाव...', दीपिका पादुकोण हिच्याबद्दल असं का म्हणाले विवेक अग्निहोत्री?
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 10:44 AM

मुंबई : ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता देखील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचं कौतुक केल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांचा ‘डबल स्टँडर्ड’ म्हणून उल्लेख करण्यात आला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी फक्त विवेक अग्निहोत्री यांनी दीपिका हिचं कौतुक केलं नसून अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. यामध्ये दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांचा देखील समावेश आहे. कारण आगामी अकादमी पुरस्कार सादर करण्यासाठी ड्वेन जॉन्सन, एमिली ब्लंट, मायकेल बी. जॉर्डन आणि सॅम्युअल एल. जॅक्सन यांच्यामध्ये दीपिका हिचं देखील नाव आहे.

दीपिका पदुकोणचं कौतुक करणाऱ्या आणि यावर्षी अकादमी अवॉर्ड्सच्या सादरकर्त्यांपैकी एक असल्याच्या रिपोर्टवर विवेक यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, ‘अमेरिकेत द कश्मीर फाइल्स सिनेमाला नागरिकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत होता… तेव्हा मी म्हणालो होतो की, भारतात प्रत्येक जण स्वतःची वेगळी ओळख तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. भारत आता जगातील आकर्षत, सुरक्षित आणि देशात व्यवसाय देखील वाढत आहे. भारतीय सिनेमांसाठी उत्तम दिवस आहेत.. ‘

आता दीपिकाचं नाव अकादमी पुरस्कार सादर करण्यासाठी पुढे आल्यानंतर विवेक यांनी अभिनेत्रीचं कौतुक केलं. ते म्हणाले, ‘एखाद्याची टीका करा जेव्हा तुम्हाला त्याचं काम आवडत नाही, पण जर त्याचं काम उत्तम असेल तर, तुम्हाला त्या व्यक्तीचं कौतुक करायला हवं. जो कोणी भारताचं नाव मोठं करत असेल, तर त्याचं कौतुक करायला हवं. ‘

हे सुद्धा वाचा

विवेक पुढे म्हणाले, ‘कोणाचं कौतुक केलं तर त्याला ‘डबल स्टँडर्ड’ म्हटलं जातं. मला वाटतं याला निष्पक्षता म्हणतात. जो कोणी भारताचं नाव मोठं करेल तो कौतुकास पात्र आहे.’ असं देखील दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले.

दरम्यान, अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. तेव्हा अनेकांनी दीपिकाला विरोध केला होता. तेव्हा विवेक अग्निहोत्री यांनी देखील दीपिकाची टीका केली होती. पण आता विवेक, दीपिकाचं कौतुक करत असल्यामुळे विवेक अग्निहोत्री चर्चेत आले आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.