मुंबई | 22 जुलै 2023 : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड कारणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे… अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मणिपूर प्रकरणार भाष्य केलं आहे. राजकारणी, खेळाडू, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री देखील या घटनेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहे. मणिपूर घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. एवढंच नाही, ४ रोजी ही धक्कादायक घटना घडली आणि बुधवारी घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे देशभर खळबळ माजली. अशात सरकारवर निशाणा साधण्यात येत असताना ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लक्षवेधी पोस्ट केली आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं.
‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमानंतर विवेक अग्निहोत्री अनेक वादग्रस्त विषयांवर स्वतःचं मत मांडतांना दिसतात. ज्यामुळे त्यांना अडचणींचा देखील सामना करावा लागतो. पण आता मणिपूर घटनेवर त्यांनी केलेली पोस्ट तुफान चर्चेत आली आहे. ट्विटवर एक नेटकरी विवेक अग्निहोत्री यांना म्हणाला,’वेळ वाया घालवू नका मर्द असाल ‘मणिपूर फाईल्स’ सिनेमा तयार करा…’
Thanks for having so much faith in me. Par saari films mujhse hi banwaoge kya yaar? Tumhari ‘Team India’ mein koi ‘man enough’ filmmaker nahin hai kya? https://t.co/35U9FMf32G
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 21, 2023
नेटकऱ्याच्या ट्विटला उत्तर देत विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘माझ्यावर एवढा विश्वास दाखवण्यासाठी धन्यवाद… प्रत्येक सिनेमा माझ्याकडूनच तयार करुन घ्यायचा आहे का मित्रा? तुमच्या भारतीय संघामध्ये कोणी मर्द नाही का?’ असा प्रश्न विवेक अग्निहोत्री यांनी उपस्थित केला. सध्या सर्वत्र विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटची चर्चा रंगत आहे. मणिपूर घटनेवर देखील विवेक अग्निहोत्री यांनी भावुक पोस्ट शेअर केली होती.
मणिपूर याठिकाणी घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सध्या सर्वत्र मणिपूर घटनेची चर्चा रंगत आहे. दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांना रस्त्यावर फिरवण्यात आलं. त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. आता जवळपास अडीच महिन्यानंतर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
या धक्कादायक प्रकरणाचे देशभर पडसाद उमटताना दिसत आहेत. ४ मे रोजी हा धक्कादायक प्रकार घडला आणि दोन महिन्यांनंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ मजली. यामुळे सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ लवकरच ‘झी 5’वर प्रदर्शित होणार आहे. पण सध्या वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख ठरवण्यात आलेली नाही. ‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ शिवाय विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘वॅक्सीन वॉर’ सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.