दोन्ही पत्नींसोबत विवेक बिंद्रा याने केलं गैरवर्तन, त्याची संपत्ती जाणून व्हाल अवाक्!
दोन्ही पत्नींसोब गैरवर्तन, अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये विवेक बिंद्रा याचं नाव, जगाला ज्ञान देणाऱ्या विवेक बिंद्रा याची संपत्ती जाणून व्हाल हैराण..., विवेक बिंद्रा खासगी आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक याच्या खासगी आयुष्याची चर्चा...
मुंबई | 25 डिसेंबर 2023 : उद्योजक आणि मोटिव्हेशनल स्पिकर विवेक बिंद्रा याच्या विरोधात पोलीस स्थानकात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. विवेक बिंद्रा यांच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाने गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे विवेक बिंद्रा याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसऱ्या पत्नीला सर्वांसमोर बेदम मारहाण केल्यामुळे विवेक बिंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पत्नीला मारहाण करताना देखील विवेक याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पतीने मारहाण केल्यामुळे यानिका गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
रिपोर्टनुसार, विवेक बिंद्रा आणि यानिका यांचं लग्न 6 नोव्हेंबर 2023 मध्ये झालं आहे. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी विवेक यांचं त्याच्या आईसोबत मोठं भाडण झालं. वाद मिटवण्यासाठी यानिका हिने दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही फायदा झाला नाही.
पण भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पत्नीला विवेक बिंद्रा याने खोलीमध्ये नेलं आणि यानिका हिला मारहाण केली. मिळत असलेल्या माहितीनुसार, यानिका हिला दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा विवेक बिंद्रा याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. विवेक बिंद्रा याच्या पहिल्या पत्नीने देखील त्याच्यावर गंभीर आरोप केलं होते. सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या विवेक बिंद्रा याच्याकडे गंडगंज संपत्ती आहे.
विवेक बिंद्रा बडा बिझनेस नावाच्या कंपनीचा सीईओ आणि अध्यक्ष आहे. कंपनीच्या वेबसाईटवर विवेक बिंद्रा याने मोटिव्हेशनल स्पिकर, लिडरशिप कंसल्टेंट, कॉर्पोरेटर ट्रेनर आणि बिझनेस ट्रेनर म्हणून स्वतःची ओळख सांगितली आहे.
विवेक बिंद्रा यूट्यूब, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) वर मोटिव्हेशनल व्हिडीओ पोस्ट करत कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. मीडिया रिपोर्टनुसार विवेक बिंद्रा याच्याकडे तब्बल 90 कोटी रुपयांची संपत्ती आहे. एवढंच नाही तर विवेक बिंद्रा याचं दिल्ली याठिकाणी भव्य घर देखील आहे.
एवढंच नाही तर, विवेक बिंद्रा याच्याकडे मुंबई, नोएडा, आणि देशातील इतर भागांमध्ये देखील संपत्ती आहे. शिवाय विवेक बिंद्रा याच्याकडे वोल्वो XC90 ही महागडी कार देखील आहे..
कोण आहे विवेक बिंद्रा याची पहिली पत्नी?
विवेक बिंद्रा याच्या पहिल्या पत्नीचं नाव गितीका बिंद्रा असं आहे. पहिल्या पत्नीसोबत देखील गैरवर्तन केल्यामुळे विवेक बिंद्रा कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. सांगायचं झालं तर, 10 मार्च रोजी याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा गितीका बिंद्रा हिने पती विवेक बिंद्रा याच्यावर नको ते व्हिडीओ शूट केल्याचे आरोप केले होते.