विवेक बिंद्रामुळे पहिल्या पत्नीच्या जीवाला होता धोका, असे व्हिडीओ शूट केल्याचे आरोप, कोण होती ‘ती’?

Vivek Bindra : कोण होती विवेक बिंद्रा याची पहिली पत्नी? पहिल्या पत्नीचे विवेक याने शूट केले होते नको ते व्हिडीओ? पोलिसांच्या तपासात आली होती धक्कादायक गोष्ट समोर... सध्या सर्वत्र विवेक बिंद्रा याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

विवेक बिंद्रामुळे पहिल्या पत्नीच्या जीवाला होता धोका, असे व्हिडीओ शूट केल्याचे आरोप, कोण होती 'ती'?
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 11:09 AM

नवी दिल्ली | 24 डिसेंबर 2023 : उद्योजक आणि मोटिव्हेशनल स्पिकर विवेक बिंद्रा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. लोकांना योग्य दिशा दाखवणाऱ्या विवेक बिंद्रा यांचं खासगी आयुष्य आता चव्हाट्यावर आलं आहे. दुसरी पत्नी यानिका हिला सर्वांसमोर मारहाण केल्यामुळे विवेक वादाच्या भोवऱ्यात आला आहे. पोलीस देखील याप्रकरणी तपास करत आहेत. एवढंच नाही तर, विवेक बिंद्रा याला अटक करा… अशी मागणी देखील होत आहे. विवेक बिंद्रा याने दुसऱ्या पत्नीसोबतच नाही तर, पहिल्या पत्नीसोबत देखील गैरवर्तन केलं. विवेक बिंद्रा याच्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे… असे आरोप विवेक याच्या पहिल्या पत्नीने केले होते.

विवेक बिंद्रा आणि त्याची पहिली पत्नी…

विवेक बिंद्रा याच्या पहिल्या पत्नीचं नाव गितीका बिंद्रा असं आहे. पहिल्या पत्नीसोबत देखील गैरवर्तन केल्यामुळे विवेक बिंद्रा कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. सांगायचं झालं तर, 10 मार्च रोजी याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा गितीका बिंद्रा हिने पती विवेक बिंद्रा याच्यावर नको ते व्हिडीओ शूट केल्याचे आरोप केले. म्हणून विवेक बिंद्रा याचा मोबाईल जप्त करण्याचे आदेश न्यायलयाने पोलिसांना दिले. पण चौकशीनंतर बिंद्रा याचा मोबाईल परत करण्यात आला.

विवेक बिंद्रा याची दुसरी पत्नी

रिपोर्टनुसार, विवेक बिंद्रा आणि यानिका यांचं लग्न 6 सप्टेंबर 2023 रोजी झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विवेक बिंद्रा याचं आईसोबत कडाक्याचं भांडणं झालं होतं. म्हणून दोघांमधील भांडणं मिटवण्यासाठी पत्नी यानिका हिने मध्यस्ती केली. तेव्हा विवेक याने पत्नीला खोलीत बंद केलं आणि तिला बेदम मारहाण केली.

हे सुद्धा वाचा

यानिका हिच्या भावाने पोलिसांनासांत तक्रार दाखल केली आहे. विवेक बिंद्रा याने पत्नी यानिका हिला सर्वांसमोर मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विवेक बिंद्रा लोकप्रिय मोटिव्हेशनल स्पिकर असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

विवेक बिंद्रा याचे फॉलोअर्स आणि सब्सक्रायबर्स

विवेक बिंद्रा याचे यूट्यूबवर तब्बल 2 कोटी 14 लाख सब्सक्रायबर्स आहेत. इन्स्टाग्रामवर विवेक बिंद्रा याला फॉलो करणाऱ्यांची संख्या 3.9 मिलियन असून एक्सवर (ट्विटरवर) 73 हजार लोकं विवेक बिंद्रा याला फॉलो करतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक बिंद्रा याची चर्चा रंगली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.