बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर सलमान; पण विवेक ओबेरॉयकडून समाजाचं कौतुक, कारण..
Vivek Oberoi on Bishnoi Community: बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर सलमान खान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जबाबदार बिश्नोई गँग, असं असताना बिश्नोई समाजाचं कौतुक का करतोय विवेक ओबेरॉय?
Vivek Oberoi on Bishnoi Community: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी गुंड लॉरेन्स बिश्नोई याने घेतली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. ज्याचे अभिनेता सलमान खान आणि दाऊद इब्राहिम यांना जे मदत करताली त्यांनी आपला हिशोब तयार ठेवावा… असं लिहित बिश्नोई गँगने सलमान खान याला देखील धमकावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई याची बॉलिवूडवर दहशत दिसून येत आहे. एकीकडे बॉलिवूडवर दहशतीचं वातावरण आहे, तर दुसरीकडे अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता बिश्नोई समाजाचं कौतुक करताना दिसत आहे.
विवेक ओबेरॉय याचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता बिश्नोई समाजाचं कौतुक करताना दिसत आहे. ‘बिश्नोई समाजासारखा दुसरा समाज नाही…’ असं अभिनेता म्हणाला होता. आता सलमान खान बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर असताना विवेकचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
‘राजस्थानमध्ये माझं बालपण गेलं आहे. राजस्थानच्या मातीवर माझं नितांत प्रेम आहे. अनेत आठवणी देखील आहेत. अनेक बिश्नोई माझे मित्र आहेत. बिश्नोई समाजासारखा दुसरा समाज नाही… सुरुवातील बिश्नोई फक्त आडनाव आहे असं मला वाटत होतं, पण मला समाजाबद्दल कळल्यानंतर मी थक्क झालो.’
‘बिश्नोई समाजाच्या लोकांनी अनेक चांगल्या कामांसाठी स्वतःचे प्राण दिले आहे. जिथे हरीण किंवा काळवीट मेल्यास त्याच्या पिल्लाला बिष्णोई समाजाच्या महिला आपल्या पोटच्या बाळाप्रमाणेच दूध पाजतात. आपल्या स्वत:च्या बाळाप्रमाणे त्याची काळजी घेतात.’ असं देखील विवेक म्हणाला होता.
दरम्यान, व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमान खानच्या चाहत्यांनी विवेकला ट्रोल केलं. सलमानशी असलेल्या शत्रुत्वामुळे विवेक बिश्नोई समाजाचं कौतुक करतोय असं अनेकांनी म्हटलं आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्री ऐश्वर्या राय हित्यासोबत असलेल्या नात्यामुळे सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यामध्ये वाद असल्याच्या देखील सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.