बॉलिवूडवर आजही आहे अंडरवर्ल्डची दहशत? विवेक ओबेरॉयचं थक्क करणारं उत्तर

Vivek Oberoi: बॉलिवूडवर आजही आहे अंडरवर्ल्डची दहशत? आजच्या सेलिब्रिटींसाठी झगमगत्या विश्वात काम करणं सोपं की कठीण? विवेक ओबेरॉयचं थक्क करणारं उत्तर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक ओबेरॉय याच्या वक्तव्याची चर्चा.

बॉलिवूडवर आजही आहे अंडरवर्ल्डची दहशत? विवेक ओबेरॉयचं थक्क करणारं उत्तर
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 3:30 PM

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने अंडरवर्ल्डबद्दल मोठा खुलासा केला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विवेक ओबेरॉय याने अंडरवर्ल्डकडून मिळालेल्या धमक्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय अंडरवर्ल्ड विरोधात आवाज उचल्याची हिंमत कशी मिळाली यावर देखील अभिनेत्याने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

मुलाखतीत विवेकला विचारण्यात आलं की, ‘जेव्हा तुझा वाईट काळ आला तेव्हा नक्की काय झालं होतं? दिग्दर्शक कॉल करत नव्हते की मिळालेले सिनेमे हातातून जात होते?’ यावर विवेक म्हणाला, ‘अनेक गोष्टी घडल्या आहेत. लोकांवर बाहेरून दबाव असायचा की मला सिनेमांमध्ये कास्ट करु नका… बॉलिवूडमध्ये तेव्हा लॉबी प्रकार खूप चालत होता. दिग्दर्शकांवर दबाव असायचा… सतत धमक्या यायच्या… मला देखील अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या आहेत.’

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

पुढे विवेक याला ‘आजही बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची दहशत आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, ‘मला असं वाटतं आजच्या मुलांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. पूर्वी अनेक प्रश्न विचारले जायचे. कोणासोबत काम केलं, कसं काम केलं, का काम केलं… पण आता असं होत नाही. पूर्वी धमक्या यायच्या. मला अनेकदा थेट जीवेमारण्याच्या धमक्या आल्या होत्या.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

अंडरवर्ल्ड विरोधात उभं राहण्याचा निर्णय कधी घेतला? असा प्रश्न देखील विवेक याला विचारण्यात आला. ‘मी माझ्या आईला रडताना पाहिलं आहे. तिला पाहिल्यानंतर मला देखील रडू आवरलं नाही. तिनेच माझी समज घातली. रडत बसलास तर काहीही होणार नाही. आई मला कॅन्सरच्या रुग्णालयात घेवून गेली. तव्हा मला कळलं की दुसऱ्याच्या अडचणींसमोर आपला अचडणी फार कमी आहे…’ असं देखील विवेक म्हणाला.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.