‘वॉन्टेड’ फेम अभिनेत्रीला ओळखणं कठीण, 14 वर्षांनंतर अशा प्रकारे आली समोर, म्हणाली…

Ayesha Takia : तब्बल 14 वर्षांनंतर समोर आली 'वॉन्टेड' फेम अभिनेत्री आयेशा टाकिया, आयेशा हिला ओळखं देखील कठीण, म्हणाली, 'काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्ता आयेशा हिच्या बदलेल्या लूकची चर्चा...

'वॉन्टेड' फेम अभिनेत्रीला ओळखणं कठीण, 14 वर्षांनंतर अशा प्रकारे आली समोर, म्हणाली...
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 9:22 AM

मुंबई | 17 फेब्रुवारी 2024 : एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री आयेशा टाकिया हिच्या सौंदर्याची आणि सिनेमांची चर्चा होती. पण गेल्या अनेक वर्षांपासून ‘वॉन्टेड’ फेम अभिनेत्री आयेशा झगमगत्या विश्वापासून दूर आहे. आयेशा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील आयेशा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 14 वर्षानंतर आयेशा टाकिया हिला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयेशा हिची चर्चा रंगली आहे.

सध्या आयेशा हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीला ओळखणं देखील कठीण झालं आहे. व्हिडीओमध्ये आयशा खूप बदललेली दिसली. अनेक वर्षांनंतर समोर आल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं. आता अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

आयेशा हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘लोकं तुमची उर्जा कशा प्रकारे मिळवतात, ही गोष्ट तुमच्या नियंत्रणात नसते. म्हणून शक्य तितक्या प्रामाणिकपणे आणि प्रेमाने आपले काम करत रहा…’, असं म्हणत आयेशा हिने ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे.

सांगायचं झालं तर, अनेक वर्षांनंतर समोर आल्यानंतर आयेशा हिला ट्रोल करण्यात आलं. आयेशा हिचं बदलेलं लूक पाहून अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्री ट्रोल केलं. ‘प्लॉस्टिक सर्जरीनंतर चेहरा खराब केलाय…’ यांसरख्या अनेक कमेंट आयेशा हिच्या व्हिडीओ करण्यात आल्या. पण अनेकांनी आयेशा हिचं कौतुक देखील केलं.

आयेशा टाकिया हिचे सिनेमे

आयेशा हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण लग्नानंतर आयेशा हिने बॉलिवूडला रामराम ठोकला. आयेशा हिने ‘टार्झन: द वंडर कार’, ‘वॉन्टेड’ आणि ‘दिल मांगे मोर’ यांसरख्या सिनेमांमध्ये काम केलं. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्याच्या काही वर्षांनंतर आयेशा बॉलिवूडपासून दूर झाली.

आयेशा सध्या तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. आयेशा हिने 2009 मध्ये राजकीय नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केलं. आयेशा आणि फरहान यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव मिखाइल आझमी असं आहे. आयेशा कायम मुलगा आणि पतीसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.