Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt: रणबीर कपूरपासून आलिया लग्नाआधी होती प्रेग्नंट? बोलता-बोलता अभिनेत्रीने केले बरेच खुलासे

रणबीरशी एप्रिलमध्ये लग्न करण्याआधी आलिया होती गरोदर? मुलाखतीत अप्रत्यक्षपणे केला 'हा' खुलासा

Alia Bhatt: रणबीर कपूरपासून आलिया लग्नाआधी होती प्रेग्नंट? बोलता-बोलता अभिनेत्रीने केले बरेच खुलासे
Alia bhatt, Ranbir Kapoor
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 10:41 AM

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्टसाठी 2022 हे वर्ष खूपच खास होतं. एप्रिल महिन्यात तिने रणबीर कपूरशी लग्न केलं. त्यानंतर दोन महिन्यांत तिने प्रेग्नेंसी जाहीर करत सर्वांना गुड न्यूज दिली. नोव्हेंबर महिन्यात आलियाने मुलीला जन्म दिला. एकानंतर एक घडलेल्या या घडामोडींमुळे आलिया गेल्या वर्षभरात चाहत्यांशी नीट संवाद साधू शकली नव्हती. मात्र आता नवीन वर्षात तिने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या प्रेग्नेंसीबाबतच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली आहेत.

आलियाने जेव्हा प्रेग्नेंसी जाहीर केली, तेव्हा अनेकांनी असा अंदाज वर्तवला होता की प्रेग्नेंसीमुळे तिने लग्न केलं. रणबीरशी लग्न करण्यापूर्वीच ती गरोदर होती, अशी चर्चा होती. यावर आलियाने थेट उत्तर तर नाही दिलं. मात्र तिने बोलता-बोलता बरेच खुलासे केले.

या मुलाखतीत आलियाला प्रेग्नेंसीदरम्यान कामकाजाचं वेळापत्रक कसं सांभाळलं, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने दिलेल्या उत्तरावरून नेटकऱ्यांना समजलं की ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती.

हे सुद्धा वाचा

आलियाने सांगितलं की तिने तिच्या करिअरमधील पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात साईन केला होता. तिला या चित्रपटाच्या शूटिंगचं शेड्युल अशा पद्धतीने पूर्ण करायचं होतं, जेणेकडून प्रेग्नेंसीमुळे तिला प्रोजेक्टमधून माघार घ्यावी लागणार नाही.

‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाच्या टीमने आलियाची काळजी घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. चित्रपटाच्या सेटवर आलियाची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. तिच्या याच वक्तव्यावरून चाहत्यांनी अंदाज लावला की ती लग्न करण्याआधीच गरोदर होती.

आलियाने 6 नोव्हेंबर रोजी मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव ‘राहा’ असं ठेवण्यात आलं. गरोदर असताना आलियाने हॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्यासोबतच ‘ब्रह्मास्त्र’चं प्रमोशनही केलं होतं.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.