चित्रपटगृहात फक्त ९९ रुपयांमध्ये प्रेक्षकांना पाहाता येणार कोणताही सिनेमा
तुम्ही सिनेमाप्रेमी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सिनेमाप्रेमींना चित्रपटगृहात कोणताही सिनेमा फक्त ९९ रुपयांमध्ये पाहाता येणार आहे. पण ९९ रुपयांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी काही अटी असणार आहेत.
मुंबई : जर तुम्ही सिनेमाप्रेमी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सिनेमाप्रेमींना २० जानेवारी रोजी चित्रपटगृहात कोणताही सिनेमा फक्त ९९ रुपयांमध्ये पाहाता येणार आहे. २० जानेवारी हा दिवस सिनेमा लव्हर्स डे म्हणून साजरा करण्यात येत आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने सिनेप्रेमींना चित्रपटगृहात फक्त ९९ रुपयांमध्ये सिनेमा पाहाता येणार आहे. गेल्या केही दिवसांपासून कोणताही सिनेमा प्रदर्शित झालेला आहे.
पण सिनेमा लव्हर्स डेच्या निमित्ताने सिनेप्रेमींना ‘आवतार २’ आणि ‘दृश्यम २’ सिनेमा चित्रपटगृहात पाहाता येईल. सिनेमा लव्हर्स डे निमित्त मल्टेप्लेक्स चेन म्हणजे सिनेमाज, आयनॉक्स आणि सिनेपॉलिस लोकांना खास ऑफर देत आहेत. याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
We are celebrating the magic of movies at a magical price for #CinemaLoversDay! Watch movies at #PVR for just ₹99 on 20th Jan’23. Applicable for any movie, any show; so book your tickets ASAP!
Book now: https://t.co/xjsmSdYACR
*Offer valid only for select cities, T&Cs apply pic.twitter.com/aBBvzoWA4c
— P V R C i n e m a s (@_PVRCinemas) January 19, 2023
सिनेमाप्रेमींना २० जानेवारी रोजी चित्रपटगृहात कोणताही सिनेमा पाहण्यासाठी काही आटींचं पालन करावं लागणार आहे. – प्रेक्षकांना फक्त २० जानेवारी रोजी फक्त ९९ रुपयांमध्ये सिनेमा पाहता येणार आहे. – ही ऑफर चंदीगड, पठाणकोट आणि पुदुच्चेरी याठिकाणी सिनेमा ९९ रुपयांमध्ये पाहता येणार नाही. – 20 जानेवारी रोजी सर्व निवडक शहरांमध्ये सर्व शोसाठी ऑफर लागू करण्यात आली आहे. – तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश याठिकाणी १०० रुपये आणि जीएसटी लागणार आहे. – प्रिमियर कॅटेगरीसाठी ऑफर लागू होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
सिनेमाप्रेमींना २० जानेवारी रोजी चित्रपटगृहात ‘हे’ सिनेमे पाहाता येणार आहेत. ‘अवतार 2’, ‘दृश्यम 2’, ‘वरिसु’, ‘कुत्ते’, ‘भेडिया’, ‘सर्कस’ आणि ‘ऊंचाई’ सिनेमे फक्त ९९ रुपयांमध्ये पाहाता येणार आहेत. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई या शहरांमध्ये प्रेक्षकांना फक्त ९९ रुपयांमध्ये पाहाता येणार आहे.