मी रेखासोबत एंजॉय केलं आणि…, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचा धक्कादायक खुलासा

Rekha Love Life: मी रेखासोबत एंजॉय केलं आणि..., फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांसोबत होते अभिनेत्री रेखा यांचे प्रेमसंबंध? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

मी रेखासोबत एंजॉय केलं आणि..., पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचा धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 2:11 PM

Rekha Love Life: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आता झगमगत्या विश्वापासून दूर असल्यातरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा रेखा यांनी दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण रेखा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना रेखा यांचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण त्यांच्या नातं कोणासोबतच लग्नापर्यंत पोहोचलं नाही… रेखा यांचं नाव फक्त बॉलिवूड सेलिब्रिटी नाही तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं.

सांगायचं झालं तर 70 – 80 च्या दशकात रेखा हिंदी सिनेविश्वावर राज्य करत होत्या. याचदरम्यान, रेखा आणि इमरान खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. एका मुलाखतीत खुद्द इमरान यांनी रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं.

रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर इमरान खान म्हणाले होते, ‘काही काळासाठी मला रेखा यांचा सहवास आवडला होता. आम्ही एंजॉय केलं आणि स्वतःच्या मार्गाला लागलो… मला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचं नव्हतं… ‘ असं देखील इमरान खान म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

सध्या रेखा आणि इमरान खान यांच्या नात्यावर आधारित एक आर्टिकल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे आर्टिकल 11 जून 1995 मधील आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, इमरान खान आणि रेखा लग्न बंधनात अडकणार आहेत. पण असं काहीही झालं नाही.

रिपोर्टनुसार, इमरान खान आणि रेखा यांच्या नात्याला अभिनेत्रीच्या आईची देखील मान्यता होती. रेखा यांच्या आईने दोघांच्या नात्याबद्दल ज्येतिषांसोबत देखील बोलणी केली होती. पण रेखा आणि इमरान यांचं लग्न होऊ शकलं नाही…

दाव्यानुसार, इमरान यांनी रेखा यांच्यासोबत मुंबईत क्वालिटी टाइम घालवला आणि दोघेही जवळपास एक महिना एकत्र राहिले मुंबईच्या बीचवर अनेकदा दोघांना स्पॉट करण्यात आलं. रेखा आणि इमरान यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘सिलसीला’, ‘खुन भरी मांग’, ‘उमराव जान’, ‘कोई… मिल गया’, ‘क्रिश’, ‘दिल है तुम्हाला’, ‘घर’, ‘नागीन’, ‘क्रिश 3’ यांसारख्या अनेक सिनेमात रेखा यांनी एकापेक्षा एका भूमिका साकारत चाहत्यांच मनोरंजन केलं. रेखा यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी जवळपास 200 सिनेमांमध्ये काम केलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.