प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरावर जवळच्या व्यक्तीकडून हल्ला; वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी
वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीने केली इतक्या रकमेची मागणी... अभिनेत्रीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ
मुंबई : पश्चिम बंगालमधील घटस्फोटित मॉडेल आणि अभिनेत्रीने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. आभिनेत्रीने केलेल्या आरोपांमुळे सर्वत्र मोठी खळबळ माजली आहे. मॉडेल आणि अभिनेत्री सुचरिता बिस्वास हिने पती विरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे. पहिल्या पतीने अभिनेत्रीच्या अनुपस्थितीत घरावर हल्ला केला आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे आरोप अभिनेत्रीने केले आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे. सुचरिता बिस्वास हिचा विवाह 2011 मध्ये नरेंद्रपूर, येथील रहिवासी पिनाकी मजुमदार याच्यासोबत झाला होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. सुरचिता हिच्या म्हणण्यानुसार, बुधवारी, 10 मे रोजी पिनाकी काही लोकांना घेऊन आला आणि घरावर हल्ला करु लागला. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी देखील पुन्हा हल्ला करण्यात आला. शिवाय त्याने घराचा दरवाजा देखील तोडला.
जेव्हा घरावर हल्ला करण्यात आला तेव्हा अभिनेत्री घरी नव्हती. तेव्हा घरात अभिनेत्रीची आई कल्पना विश्वास आणि वडील निमाईचंद्र विश्वासम घरात होते. अभिनेत्रीच्या पहिल्या पतीने त्यांना मारहाण देखील केली त्याच प्रमाणे घरातील दागिन्यांची देखील चोरी केली… असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे. शिवाय पहिल्या पतीने आई – वडिलांकडून दोन लाख रुपये मागितले असल्याचे आरोप देखील अभिनेत्रीने केले आहेत.
टॉलिवूड अभिनेत्रीच्या घरावर हल्ला केल्याच्या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी अभिनेत्रीच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे..
घडलेल्या घटनेबद्दल अभिनेत्री म्हणते, ‘मी कामानिमित्त दक्षिण भारतात गेली होता. माझ्या आईने फोन करून सांगितलं की आमच्या घरावर हल्ला झाला आहे. माझा पहिला पती पिनाकी मुझुमदार याने हा हल्ला केला. त्याने घरी येऊन माझ्या आईला शिवीगाळ केली. आईने घडला प्रकार सांगितल्यानंतर मी तात्काळ घरी आली.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘घटस्फोटानंतर माझा त्याच्यासोबत कोणताही संबंध नव्हता… मला नाही माहिती त्याने असं का केलं असेल…त्याने आम्हाला धमकी दिली आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा अशी माझी मागणी आहे….’ अभिनेत्रीने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलीस तपास करत आहेत.