जया बच्चन रेखा यांना असं काय म्हणाल्या होत्या की, त्या अमिताभ यांच्या जीवनातून निघून गेल्या

रेखा आणि अमिताभ यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. त्यांच्याबाबत आजही चर्चा होते. ज्या वेळी रेखा आणि अमिताभ यांचे प्रेम फुलत होते, त्या वेळी जया यांच्या कानावरही ही बातमी पोहोचली होती. जया यांनी ही परिस्थिती कशी हाताळली हे फार कमी लोकांना माहीत आहे.

जया बच्चन रेखा यांना असं काय म्हणाल्या होत्या की, त्या अमिताभ यांच्या जीवनातून निघून गेल्या
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 10:24 PM

अमिताभ आणि रेखा यांचं नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन मोठी नाव आहेत. या दोन स्टार्सची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. रेखा आणि अमिताभ यांच्या चर्चा ही बॉलीवूडमध्ये नेहमीच असते. पण रेखा आणि अमिताभ यांच्याबद्दल बोलणारे हे विसरतात की त्यांच्यामध्ये तिसरी व्यक्ती आहे आणि ती म्हणजे जया बच्चन. ज्या वेळी रेखा आणि अमिताभ यांचे प्रेम फुलत होते, त्या वेळी जयाच्या कानावरही ही बातमी पोहोचली होती. जया यांनी ही परिस्थिती कशी हाताळली हे फार कमी लोकांना माहीत आहे.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील प्रेमप्रकरण 1976 मध्ये ‘दो अंजाने’ चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाले होते. पण शूटिंगदरम्यान रेखासोबत गैरवर्तन केल्याबद्दल अमिताभ यांनी सहकलाकाराला मारहाण केल्याने ही गोष्ट सगळ्यांना कळाली. नंतर ही गोष्ट जयापर्यंत पोहोचली. ‘सिलसिला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि अमिताभ या दोघांनीही फक्त अभिनयच केला नसून प्रत्यक्षात एकमेकांवर प्रेम केल्याचेही बोलले जाते.

View this post on Instagram

A post shared by Rekha (@legendaryrekha)

जेव्हा ही प्रेमाची बातमी जया यांच्या कानावर पोहोचली तेव्हा जया यांनी काय केले हे ज्यांना माहित आहे ते आजही जया बच्चन यांच्या धाडसाचे कौतुक करतात. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या बातम्या येताच जया यांनी रेखाला आपल्या घरी जेवायला बोलावलं. रेखालाही माहित होतं की जयाला तिच्या आणि अमिताभबद्दल सगळं माहीत आहे, त्यामुळे तिच्या घरी जेवायला जाणं थोडं विचित्र होतं. रेखाला वाटले की जया घरी आल्यावर खूप रागावेल किंवा काहीतरी चुकीचे बोलेल. पण जयाने तसे काही केले नाही.

View this post on Instagram

A post shared by Rekha (@legendaryrekha)

रेखा अमिताभ यांच्या घरी गेल्यावर जया यांनी त्यांचे स्वागत केले.जया रेखाला खूप प्रेमाने भेटली आणि तिला जेवण खाऊ घातले. पण तिला भेटण्यापूर्वी जया रेखाला असे काही बोलली की ती अमिताभच्या घरी परत आली नाही ना त्यांच्या आयुष्यातून ही निघून गेली. जया रेखाला म्हणाली की, मी अमितला कधीही सोडणार नाही.

जया यांच्या या विधानामुळे रेखाला समजले की अमिताभ आणि त्यांचे नातं जरी जुळलं असलं तरी ते कधीही एकत्र होऊ शकत नाहीत.  खऱ्या आयुष्यात त्यानंतर रेखाने पुन्हा कधीच अमिताभ यांच्या घरात पाऊल ठेवले नाही किंवा अमिताभसोबत कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. जया बच्चन यांच्या या विधानाने दोघांचीही प्रेम कहाणी संपली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.