आठवडाभर विचार करत होतो की…; मोदींना भेटल्यावर काय म्हणाला रणबीर कपूर

राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबीयांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. करीना कपूर खान, सैफ अली खान, आलिया भट्ट, रणबीर कपूरसह कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. कपूर कुटुंबीयांच्या पंतप्रधानांसोबतच्या या भेटीचा व्हिडिओही समोर आला आहे.

आठवडाभर विचार करत होतो की...; मोदींना भेटल्यावर काय म्हणाला रणबीर कपूर
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 9:00 PM

हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव असलेले राज कपूर यांची 100 वी जयंती येत आहे. राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील ते व्यक्तीमत्व आहे ज्यांनी बॉलीवूडला सर्वात सुवर्णकाळ दिला. त्यामुळे त्यांची 100 वी जयंती या वर्षी अधिक खास बनवण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब कामाला लागलं आहे. त्यानिमित्ताने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संपूर्ण कपूर कुटुंब मोदींना निमंत्रण देण्यासाठी दिल्लीत पोहोचलं होतं. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर करीना कपूरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या खास क्षणांचे फोटो कपूर कुटुंबियांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत बॉलिवूड अभिनेता आणि राज कपूर यांचा नातू रणबीर कपूर म्हणाला की, आमच्या कुटुंबाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. ज्यामध्ये आम्ही चर्चा करत होतो की, तुम्हाला भेटल्यावर काय बोलायचं. त्यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं की, तुम्हाला हवे ते तुम्ही बोलू शकतात. मी ही तुमच्याच कुटुंबातील आहे.

रणबीर पंतप्रधानांना काय म्हणाला?

पीएम मोदींना भेटायला आलेल्या राज कपूर यांची मुलगी आणि ऋषी कपूर यांची बहीण रीमा कपूर यांनी ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या हिट गाण्याची एक ओळ बोलून त्यांच्या वडिलांची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या की, आज या खास प्रसंगी मला वडिलांच्या चित्रपटातील गाण्याची एक ओळ आठवते आहे – ‘मैं ना रहूंगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेंगे निशानियां’’. पंतप्रधानांशी संवाद साधताना रणबीर कपूरने सांगितले की, मी आठवडाभरापासून या तयारी करत होतो, पण भेटल्यावर काय बोलावे हे समजत नव्हते. त्याची मावशी रीमाही त्याला रोज फोनवर हे विचारायची. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान हसत हसत म्हणाले की, मी सुद्धा तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे, तुम्हाला जे हवे ते बोलू शकता.

राज कपूर यांची जयंती

रणबीर कपूरने सांगितले की, राज कपूर यांच्या जयंतीनिमित्त एक फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला जात आहे. जिथे संपूर्ण चित्रपट समुदाय जमणार आहे. त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीवरील प्रभाव या महोत्सवात लक्षात राहील. हा महोत्सव 13-15 डिसेंबर 2024 पर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये सुमारे 40 शहरांमधील 135 हॉलमध्ये त्यांचे 10 सर्वोत्तम चित्रपट दाखवले जातील.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.