‘बिग बॉस’च्या घरात चादरीच्या आत नेमकं काय घडतं? ईशा-समर्थबद्दल नाविदचा धक्कादायक खुलासा

बिग बॉसच्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये नाविद सोल हा स्पर्धक घराबाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बरेच धक्कादायक खुलासे केले. त्यापैकीच एक खुलासा ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांच्याबद्दल होता. मध्यरात्री घराच काय घडतं, त्याबद्दल त्याने सांगितलं.

'बिग बॉस'च्या घरात चादरीच्या आत नेमकं काय घडतं? ईशा-समर्थबद्दल नाविदचा धक्कादायक खुलासा
समर्थ जुरेल
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 10:55 AM

मुंबई : 22 नोव्हेंबर 2023 | बिग बॉसचा 17 वा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. एकीकडे घरातील स्पर्धकांमध्ये भांडणं पहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे काही स्पर्धकांमध्ये रोमान्सची कळी उमलतेय. ‘उडारियाँ’ फेम ईशा मालवीयचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेल जेव्हापासून बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्रीने आला आहे, तेव्हापासून या दोघांमध्ये रोमान्स पहायला मिळतोय. समर्थ घरात आल्यापासून अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये त्याची वागणूक प्रेक्षकांना खटकली. आता याच व्हायरल क्लिप्सबाबत नाविद सोलने मोठा खुलासा केला आहे. नाविद नुकताच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

नाविदला बिग बॉसमधील एक क्लिप दाखवून प्रश्न विचारला गेला. ‘बिग बॉसच्या घरात स्पर्धक इंटिमेट होतात का?’, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. या क्लिपमध्ये ईशा बसलेली होती आणि ब्लँकेटच्या आत काही हालहाली होताना दिसत आहे. तिच्याजवळच नाविद बसला होता. यावर बोलताना नाविद म्हणाला, “त्याक्षणी असंकाही घडलं नव्हतं. ब्लँकेटमध्ये जिग्ना वोराचा पाय होता. ती स्ट्रेचिंग करत होती. पण जेव्हा मी रुम नंबर 1 मध्ये होतो. तेव्हा ईशा आणि समर्थ हे दोघं ब्लँकेटमध्ये सतत काही ना काही करायचे. मी ही गोष्ट अंकितालासुद्धा सांगितली होती.”

हे सुद्धा वाचा

“समर्थ सतत ईशाच्या मागे लागलेला असतो. त्याचा स्वभाव चांगला आहे, पण तो भरकटत चालला आहे. नील भट्ट आणि मुनव्वर फारुकीसुद्धा चांगले खेळाडू आहेत. या सगळ्यात विकी जैन खूप चलाखीने खेळ खेळतोय. पण अंकिता त्याच्यापुढे निघून जाईल”, असंही मत नाविदने मांडलं.

पहा व्हिडीओ

बिग बॉसच्या घरात रोमान्स पहायला मिळणं ही काही प्रेक्षकांसाठी नवीन गोष्ट नाही. मात्र समर्थने अनेकदा हद्दच पार केली. समर्थ आणि ईशाचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. यामध्ये समर्थ त्याची गर्लफ्रेंड ईशाला किस करताना दिसतोय. ईशाला तो कधी गालावर, कधी खांद्यावर तर कधी पोटावर किस करतो. यावर ईशाची काही खास प्रतिक्रिया दिसून येत नाही. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘यांना लस्ट स्टोरीजमध्ये पाठवा’, असं एकाने लिहिलं होतं. तर ‘या दोघांना बिग बॉसच्या घराबाहेर काढा’, असंही दुसऱ्याने म्हटलं होतं. समर्थ आणि ईशाचा हा असा पहिलाच व्हिडीओ नाही, ज्यामध्ये दोघं रोमँटिक होताना दिसतायत. याआधीही दोघांचा बेडवर सोबत झोपल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.