उर्फी जावेदच्या कपड्यांच्या वादामागे नेमकं दडलंय तरी काय? सुषमा अंधारे म्हणतात…
. तुम्ही बसल्यावरही लोकं तुम्हाला म्हणतील ना तुमच्या नोटिसा ५६ असतील म्हणून. हे वाईट आहे, असं होऊ नये, असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं.
मुंबई : ऊर्फी जावेदवरून (Urfi Javed) चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्या वादात आता सुषमा अंधारे यांनी उडी घेतली. महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळविण्यासाठीचं चित्रा वाघ (Chitra Wagh) आटापिटा करताहेत. असा आरोप त्यांनी लावला. सुरुवातीला ऊर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात वाद होता. त्यात भर पडली रुपाली चाकणकर यांची. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधलाय. चित्रा वाघ यांना कदाचित महिला आयोगाचं अध्यक्षपद हवं असेल. असं अंधारे म्हणाल्या. कोणीतरी स्वईच्छेनं कपडे घालते किंवा उतरविते हा मुद्दा महत्त्वाचा नसावा. जगण्याच्या प्रश्नांकडं लक्ष दिलं गेले पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे. महिला आयोगाच्या नोटिशीटी अशी टिंगल उडविलं, यातून तुमची मग्रुरी दिसते. मुद्दा त्या खुर्चीचा आहे त्याचा सन्मान राखला पाहिजे. त्या खुर्चीबद्दल अशा पद्धतीनं बोलत असाल तर वाईट आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हंटलंय.
कदाचित त्यांना खाली खेचून त्या चेअरवर तुम्हाला बसायचंही असेल. तुम्ही बसल्यावरही लोकं तुम्हाला म्हणतील ना तुमच्या नोटिसा ५६ असतील म्हणून. हे वाईट आहे, असं होऊ नये, असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही चित्रा वाघ यांना लक्ष केलंय. चित्रा वाघ यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याचा पश्चाताप होत असेल, असंही रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला मान देणं हे सर्वांच काम असतं. असंही त्यांनी सांगितलं.
ऊर्फी जावेदनं ट्विटरवर ट्वीट टाकत चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. अमृता फडणवीस यांनीही ऊर्फीमध्ये काहीही वावगं नसल्याचं म्हटलंय. महाविकास आघाडीच्या महिलासुद्धा रुपाली चाकणकर यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या. त्यामुळं दीपाली सय्यद यांनी चित्रा वाघ यांची बाजू घेतली आहे.