अशोक सराफ यांचा मुलगा जगतो असं आयुष्य ‘की’ प्रत्येकाला वाटेल अभिमान, नेमकं करतो तरी काय?
अशोक सराफ यांच्यासोबत काम करणाऱ्या सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गज अभिनेत्यांची पुढची पिढी तुम्हाला सिनेसृष्टीत काम करताना दिसते. त्यामुळे अशोक सराफ यांचा मुलगादेखील सिनेसृष्टीतच अभिनेता म्हणून समोर येईल, अशी अपेक्षा सर्वांना वाटत होती.

ashok saraf son aniket saraf
- मराठमोळे अभिनेते अशोक सरफा यांनी अख्ख्या मराठी सिनेसृष्टीवर राज्य केलं. हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं.
- अशोक सराफ यांच्यासोबत काम करणाऱ्या सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गज अभिनेत्यांची पुढची पिढी तुम्हाला सिनेसृष्टीत काम करताना दिसते. त्यामुळे अशोक सराफ यांचा मुलगादेखील सिनेसृष्टीतच अभिनेता म्हणून समोर येईल, अशी अपेक्षा सर्वांना वाटत होती.
- त्याला अनेकजण मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र वडिलांच्या कामाचं ओझं डोक्यावर न घेता. करिअर करण्यासाठी त्याने स्वत:च्या आवडीचं आणि आगळंवेगळं क्षेत्र निवडलं आहे.
- अनेकजण आपल्या आईवडिलांच्या दबावाखाली किंवा समाजाच्या बंधनांपुढे झुकून आवड नसणाऱ्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडतात. अशोक सराफ याचा मुलगा अनिकेत सराफ याने मात्र कशाहीची तमा न बाळगता एकं वेगळं क्षेत्र निवडलं आहे.
- त्याच्या याच निर्णयामुळे सर्वांनाच त्याचा अभिमान वाटतो. विशेष म्हणजे त्याचे आई-वडील अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनीदेखील त्याच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
- अनिकेत सराफ हा कोणताही अभिनेता नसून तो व्यवसायाने एक शेफ आहे. त्याला वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याची पहिल्यापासूनच आवड होती. याच आवडीला त्याने करिअर म्हणून निवडण्याचे ठरवले. आजघडीला तो एक प्रसिद्ध शेफ आहे.
- अनिकेतनं त्याचं शिक्षण फ्रान्समध्ये पूर्ण केलं. तो भारतीय तसेच पाश्चिमात्त्य असे दोन्ही प्रकारचे खाद्यपार्थ बनवतो. अनिकेत सराफ हा सोशल मीडियावर निक सराफ या टोपण नावाने आहे. तो आपल्या या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने तयार केलेले वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे व्हिडीओ शेअर करतो.