लग्न म्हणजे काय? जिनिलियाला रितेशने दिलेलं उत्तर पाहून नेटकरी म्हणाले ‘तुम्हाला पण त्रास..’

| Updated on: Feb 25, 2025 | 11:09 AM

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये जिनिलिया रितेशला विचारते, "लग्न म्हणजे काय?" त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल.

लग्न म्हणजे काय? जिनिलियाला रितेशने दिलेलं उत्तर पाहून नेटकरी म्हणाले तुम्हाला पण त्रास..
Riteish and Genelia Deshmukh
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या जोडीवर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव होतो. सोशल मीडियावरही दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. रितेश आणि जिनिलिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसोबत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. असाच एक त्यांचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया रितेशला लग्नाबद्दल प्रश्न विचारते. त्यावर रितेशने दिलेलं भन्नाट उत्तर ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

या व्हिडीओत जिनिलिया रितेशला विचारते, “मला एक सांगा, लग्न म्हणजे काय?” त्यावर रितेश उत्तर देतो, “लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाढवपणा.” रितेशच्या तोंडून निघालेलं हे उत्तर ऐकल्यानंतर जिनिलियाच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे असतात. या व्हिडीओला 19 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज तर आठ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘म्हणजे तुम्हाला पण त्रास आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘भाऊंचं यमराजासोबत उठणं बसणंं आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘लग्न म्हणजे रितेश आणि जिनिलिया’, अशीही प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. रितेश आणि जिनिलिया असे भन्नाट विनोदी रील्स बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतात. त्याला नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो.

हे सुद्धा वाचा

जिनिलिया आणि रितेशने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर 2016 मध्ये जिनिलिया आणि रितेश यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव राहील असं आहे. लग्नानंतर जिनिलियाने काही काळ कामातून ब्रेक घेतला होता. मध्यंतरीच्या काळात ती ‘जय हो’ आणि ‘फोर्स 2’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. मात्र 2012 मधील ‘ना इष्टम’ या तेलुगू चित्रपटानंतर ‘वेड’ या मराठी चित्रपटामध्येच तिने मुख्य भूमिका साकारली. कुटुंबाकडे, मुलांकडे अधिक लक्ष देता यावं यासाठी ग्लॅमर विश्वातून ब्रेक घेतल्याचं तिने याआधीच्या एका मुलाखतीतही स्पष्ट केलं होतं. रितेश आणि जिनिलियाकडे एक आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं.