कोण होते राखी सावंत हिचे सावत्र वडील, ड्रामा क्वीनचं खरं नाव तुम्हाला माहितीये?
Rakhi Sawant : राखी हिच्या वडिलांच्या निधनानंतर ड्रामा क्वीनच्या आईने केलं दुसरं लग्न, कोण होते राखी हिचे सावत्र वडील? राखी सावंत हिला आहे एक भाऊ आणि बहीण, पण...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राखी सावंत हिच्या खासगी आयुष्याची चर्चा
मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून राखी झगमगत्या विश्वात राहून चाहत्यांचं मनोरंजन करते. यामुळे राखी हिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. सोशल मीडियावर राखी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.. एवढंच नाही राखी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राखी हिच्या आईचं निधन झालं.. पण फार कमी लोकांना राखी हिच्या सावत्र वडिलांबद्दल माहिती आहे. शिवाय राखी हिचं खरं नाव देखील फार कमी लोकांना माहिती आहे.
राखी हिच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या आईने दुसरं लग्न केलं. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 15 वर्षांपूर्वी राखी सावंत हिच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर राखीच्या आईने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. राखीच्या आईने दुसरं लग्न पोलीस शिपाई आनंद सावंत यांच्यासोबत केलं.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईने दुसरं लग्न केल्यानंतर राखी हिने देखील स्वतःचं नाव बदललं. आईच्या दुसऱ्या लग्नापूर्वी राखीचं नाव नीरु भेडा असं होतं. पण राखी हिच्या दुसऱ्या वडिलांचं निधन हृदय विकाराच्या झटक्याने झालं. 28 जानेवारी 2023 मध्ये राखी सावंतच्या आई जया भेडा यांनी जुहूच्या क्रिटीकेयर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
राखी सावंत हिच्या भावंडांबद्दल देखील फार कमी लोकांना माहिती आहे. राखी सावंत हिला एक भाऊ आणि बहीण आहे. राखी सावंतच्या भावाचं नाव राकेश सावंत असं असून तो एक दिग्दर्शक आहे. तर राखी हिच्य बहिणीचं नाव उषा असं आहे. उषा सावंत देखील इंडस्ट्रीचा एक भाग आहे. पण उषा सावंत कधीही राखी हिच्यासोबत दिसत नाही.
राखी सावंत हिची संपत्ती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राखी सावंत हिचे मुंबईत दोन अपार्टमेंट आहेत. ज्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. एवढंच नाही तर, राखी हिच्याकडे 11 कोटी रुपयांचा एक बंगला देखील आहे. राखी सावंत हिच्याकडे एकून 37 कोटी रुपयांची संपत्ती आहे. शिवाय राखी सावंत हिच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या देखील आहेत.
सोशल मीडियावर राखी कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर, वादाच्या भोवऱ्यात असली तरी राखी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राखी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.