Govinda | काय आहे 1000 कोटींचा पाँझी घोटाळा? 2 लाख लोकांची कशी झाली फसवणूक? गोविंदावरही टांगती तलवार
Govinda | गोविंदा यांच्यावरील विश्वास अनेकांना पडला महागात; 2 लाख लोकांची कशी झाली फसवणूक? नक्की प्रकरण काय... जाणून घ्या... अभिनेत्याला देखील चौकशीसाठी बोलावणार... भूमिका स्पष्ट झाल्यानंतर नक्की काय घडणार?
मुंबई : 16 सप्टेंबर 2023 | पाँझी घोटाळ्यामुळे अभिनेता गोविंदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. १००० कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी गोविंदा याला देखील समन्स पाठवण्यात आला आहे. एवढंच नाही तर पाँझी घोटाळ्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. १००० कोटी रुपयांच्या घोताळ्यात तब्बल २ लाख लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. अशात पाँझी घोताळा नक्की काय आहे? आणि २ लाख लोक या जाळ्यात कसे आडकले? यांसारखे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तर पाँझी घोटाळा नक्की काय आहे जाणून घेवू. शिवाय या प्रकरणार अभिनेता गोविंदा याचं नाव कसं आलं याबद्दल देखील जाणून घेवू…
सांगायचं झालं तर, १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा ऑनलाइन क्रिप्टोशी संबंधित आहे. पाँझी या घोटाळ्याच्या माध्यमातून झालेल्या स्किमचं नाव आहे. रिपोर्टनुसार, सोलर टेक्नो अलायन्स कंपनीने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत परवानगी शिवाय बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, झारखंड आणि इतर राज्यांतील लाखो लोकांकडून कोट्यवधी रुपये क्रिप्टोमध्ये गुंतवले होते. यामध्ये २ लाखांपेक्षा जास्त लोकांची फसवणूक करण्यात आली आहे.
कशी लोकांची केली फसवणूक?
देशभरातील 2 लाख लोकांना पाँझी स्किमचं आमिष दाखवून त्यांनी कंपनीच्या नावावर 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. शिवाय गोविंदा देखील सामिल असल्यामुळे कोणताही घोटाळा होवू शकत नाही… असं देखील लोकांना वाटलं. म्हणून लोकांनी पाँझी स्किममध्ये गुंतवणूक केली. मात्र लोकांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
गोविंदा काय कनेक्शन?
याप्रकरणात अभिनेता गोविंदा याचं देखील नाव समोर येत आहे. कारण अभिनेत्याने कंपनीच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये काम केलं होतं. अशात गोविंदाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. पण अभिनेत्याला चौकशीला सामोरं जावं लागणार असल्याची चर्चा देखील जोर धरत आहे. अभिनेत्याच्या चौकशीनंतर त्याची भूमिका स्पष्ट होईल.
जर अभिनेत्याने फक्त प्रमोशनल व्हिडीओमध्ये काय केलं असेल तर गोविंदा याल आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेत्याला साक्षीदार म्हणून उभं राहावं लागेल… अशी माहिती देखील समोर येत आहे. सध्या याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरु आहे…