इमरानसोबत इंटिमेट सीनसाठी अभिनेत्रीने साफ नकार दिला तर…; तो स्पष्टच म्हणाला “ती कंफर्टेबल…”
इमरान हाश्मी हा बॉलिवूडचा सिरिअल किसर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या चित्रपटात बोल्ड आणि इंटिमेट सीन असतातच. पण जर एखाद्यावेळी जर अभिनेत्रीने त्याच्यासोबत इंटिमेट सीन करण्यास साफ नकार दिला तर तो काय करतो किंवा ती परिस्थिती कशी हाताळतो. याबद्दल त्या एका मुलाखतीत स्पष्टच सांगितलं आहे.

बॉलिवूडचा सिरिअल किसर म्हटलं की त्या अभिनेत्याला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. अर्थातच सर्वानाच माहितीये तो अभिनेता म्हणजे इमरान हाश्मी. इमरानच्या चित्रपटात इंटिमेट सीन किंवा किसींग सीन नसणार असं कधीही होणार नाही. तो जरी या टॅगमुळे हैराण झाला असला तरी तो त्याच टॅगमुळे प्रसिद्धही आहे. त्याचे चित्रपट जेवढे हीट असतात त्याहीपेक्षा त्याच्या चित्रपटातील गाणे हीट असतात. त्यामुळे चाहते त्याच्या नवीन चित्रपटाची नक्कीच आतुरतेनं वाट पाहतच असतात. इमरानचा ‘ग्राउंड झीरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री जर इंटिमेट सीनसाठी तयार नसेल तर काय करतो इमरान?
मुख्य म्हणजे या चित्रपटात एक मराठी मोळी अभिनेत्री इमरानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. आणि अर्थातच या चित्रपटातही बोल्ड सीन असणारच आहे. पण प्रत्येकवेळेला अभिनेत्री ही इंटिमेट किंवा बोल्ड सीन करण्यासाठी कंफर्ट असेलच असं नाही. काही वेळेला त्या साफ नकारही देतात. मग त्यावेळेस ती परिस्थिती इमरान कशी हाताळतो याबद्दल त्याने सांगितलं आहे. एका मुलाखतीत इमरान म्हणाला की, “मी अनेकदा दिग्दर्शकाशी बोलून सह-कलाकारासोबत जे इंटिमेट सीन करणार असतो, त्याविषयी चर्चा करतो. इंटिमेट सीन करताना एक पारदर्शकता आणि सहजता असेल, याचा आम्ही विचार करतो. अनेकदा असं झालंय की, एखादी अभिनेत्री एखादा किसिंग सीन किंवा बोल्ड सीन करण्यासाठी तयार नसेल. किंवा त्या कलाकाराला अवघडलेपणा येत असेल तर आम्ही तो सीन, तसा एखादा डान्सही रद्द करतो आणि तसं केलंही आहे.”
View this post on Instagram
अभिनेत्रीचा कंफर्ट पाहिला जातो का?
तर अशापद्धतीने इमरानने सांगितंल की कोणत्याही बोल्ड किंवा इंटिमेट सीन करताना सगळ्यात आधी अभिनेत्रीचा कंफर्ट पाहिला जातो. ती तयार असेल तरच तो केला जातो. नाही कोणत्याही जबरदस्तीने तो सीन करण्यासाठी तिला तयार केलं जात नाही. अशा पद्धतीने तो त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला समजून घेऊन ती परिस्थिती हातळतो.
इमरान हाश्मीसोबत मराठमोळी अभिनेत्री स्क्रिन शेअर करणार
इमरान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याच्या आगामी ‘ग्राऊंड झिरो’ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ‘ग्राऊंड झिरो’मध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात इमरान बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर, सई ताम्हणकर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. फक्त सैनिक नव्हे, तर त्यांच्या पाठिशी उभ्या असलेल्या पत्नींची ताकद कशी असते, हे सईच्या भूमिकेतून दिसणार आहे. 2001 मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. हा चित्रपट 25 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात सईचा एका वेगळ्या धाटणीचा अभिनय पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सईचा अभिनय पाहायला नक्कीच सगळे प्रेक्षक आतुर आहेत. विशेष म्हणजे, या सिनेमात मराठीतील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.