संजय दत्त यांच्या चौथ्या लग्नाचं रहस्य नक्की काय? 65 व्या वर्षी घेतल्या ‘सप्तपदी’, चहाते अवाक्

Sanjay Dutt: संजय दत्त याने चौथ्यांदा कोणासोबत केलं लग्न? काय आहे संजूबाबाच्या चौथ्या लग्नाचं रहस्य? वयाच्या व्या वर्षी घेतल्या 'सप्तपदी', चहाते अवाक्, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजूबाबा यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

संजय दत्त यांच्या चौथ्या लग्नाचं रहस्य नक्की काय? 65 व्या वर्षी घेतल्या 'सप्तपदी', चहाते अवाक्
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 8:16 AM

Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्त कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता सप्तपदी घेताना दिसत आहे. पहिल्या पत्नीचं निधन, दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट आणि तिसऱ्या पत्नीसोबत सुखी संसार असताना संजूबाबा चौथ्यांदा कोणासोबत आणि का सप्तपदी घेत आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला असेल. तर अभिनेत्याने पत्नी मान्यता दत्त हिच्यासोबत चौथ्यांदा सप्तपदी घेतल्या आहे.

व्हिडीओमध्ये संजूबाबा भगव्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे, तर मान्यता साध्या लूकमध्ये दिसत आहे. अशात वयाच्या 65 व्या वर्षी अभिनेत्याने का सप्तपदी घेतल्या असा प्रश्न अनेकांना पडला असेल. व्हिडीओ मागचं सत्य देखील अखेर समोर आलं आहे.

सर्वांना असं वाटत आहे की, संजय दत्त आणि मान्यता दत्त यांनी पुन्हा लग्न केलं आहे. पण असं काहीही नाही. एका पूजेमधील विधी म्हणून दोघांनी सप्तपदी घेतल्या आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ संजूबाबाच्या घरातील असल्याचा सांगितला जात आहे. अभिनेत्याच्या घरात नुकताच रिनोव्हेशनचं काम पूर्ण झालं आहे. ज्यामुळे घरात पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं.

पूजेमध्ये संजय दत्त आणि मान्यता यांनी सप्तपदी घेतल्या. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संजय दत्त आणि मान्यता यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये मान्यता आणि संजय यांनी लग्न केलं.

लग्नानंतर मान्यता हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. संजय – मान्यता यांच्या मोठ्या मुलीचं इकरा आणि मुलाचं नाव शहरान असं आहे. अभिनेता आता तिसरी पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील संजूबाबाचे कुटुंबासोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

लग्नानंतर मान्यता हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. संजय – मान्यता यांच्या मोठ्या मुलीचं इकरा आणि मुलाचं नाव शहरान असं आहे. अभिनेता आता तिसरी पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील संजूबाबाचे कुटुंबासोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

संजूबाबा याच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 1987 मध्ये पहिलं लग्न ऋचा शर्मा हिच्यासोबत केलं होतं. पण गंभीर आजारामुळे ऋचा हिचं निधन झालं. दोघांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव त्रिशाला दत्ता असं आहे.

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर संजय दत्त याने दुसरं लग्न रिया पिल्लई हिच्यासोबत केलं. पण दोघांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 10 वर्षानंतर रिया आणि संजय दत्त यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्याने तिसरं लग्न मान्यता हिच्यासोबत केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.