न्युडिटीबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला ऐश्वर्या रायचं रोखठोक उत्तर; म्हणाली “तू पत्रकार..”
'कान्स फिल्म फेस्टिव्हल' जवळ आला असताना अभिनेत्री ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती न्युडिटीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला रोखठोक उत्तर देताना दिसतेय.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने बॉलिवूडमध्ये अनेक दमदार भूमिका तर साकारल्याच आहेत, पण त्याचसोबतत तिने परदेशातही आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. म्हणूनच जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर एखादी बॉलिवूड अभिनेत्री जाते, तेव्हा तिथले फोटोग्राफर आणि मीडियासुद्धा अनवधानाने ‘ऐश्वर्या’ म्हणून हाक मारते. आता पुन्हा एकदा हा फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात येत असल्याने ऐश्वर्या ट्रेंडमध्ये आली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याचा स्टायलिश अंदाज नेहमीच पहायला मिळतो. मात्र ती केवळ तिच्या लूकमुळेच चाहत्यांची मनं जिंकत नाही, तर तिच्या मतांमुळेही ऐश्वर्याला असंख्य चाहत्यांचा पाठिंबा मिळतो. ऐश्वर्याची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये ती फ्रेंच मीडियाला सडेतोड उत्तर देताना दिसतेय.
या मुलाखतीत ऐश्वर्याला भारतीय सिनेसृष्टीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “भारतीय चित्रपटांमध्ये ग्राफिक इंटिमसी किंवा न्युडिटी फारशी का दाखवली जात नाही”, असा सवाल ऐश्वर्याला केला होता. त्यावर उत्तर देत ती म्हणाली, “मी कधीच तसे सीन्स केले नाहीत आणि मला न्युडिटी दाखवण्यातही काही रस नाही.” यापुढे तो पत्रकार ऐश्वर्याला मध्येच थांबवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती पुढे म्हणते, “मला असं वाटतंय की मी एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाशी बोलतेय. मी नक्की कोणाशी बोलतेय? तुम्ही पत्रकार आहात, तेच काम करा भाऊ.”
When Aish got pissed😬rightfully so I guess byu/Scary_Giraffe_4996 inBollyBlindsNGossip
हे सुद्धा वाचा
न्युडिटीबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं रोखठोक उत्तर दिल्याप्रकरणी नेटकऱ्यांनी ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. “ती बरोबर आहे. हे पत्रकार अभिनेत्यांना चित्रपटातील न्युडिटीबद्दल प्रश्न विचारतात का”, असा सवाल एकाने केला. तर ‘ऐश्वर्याने योग्य उत्तर दिलंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मोहब्बतें’, ‘धूम 2’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ब्राइड अँड प्रेजुडाइस’, ‘मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस’ आणि ‘पिंक पँथर’मध्ये काम केलंय. ऐश्वर्या नुकतीच मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 1’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन 2’मध्ये झळकली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून विशेष कौतुक झालं होतं.