“..तर लोकांनी मला ठेचून मारलं असतं”, ऐश्वर्या राय असं का म्हणाली?

करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील राणी मुखर्जीच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीला शोधणं खूप कठीण होतं. कारण आधीच आठ अभिनेत्रींनी करणला नकार दिला होता. अखेर राणीला ही भूमिका मिळाली होती.

..तर लोकांनी मला ठेचून मारलं असतं, ऐश्वर्या राय असं का म्हणाली?
Aishwarya Rai
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 10:19 AM

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने आजवरच्या तिच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. तिच्या करिअरमध्ये आणखी एका जबरदस्त भूमिकेचा समावेश झाला असता, मात्र त्या भूमिकेला तिने नकार दिला होता. मॉडेलिंगच्या दिवसांत जे केलं, तीच गोष्ट पुन्हा करत असल्याचा ठपका लागेल या भीतीने तिने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला नकार दिला होता. हे फार क्वचित लोकांना माहीत असेल की करणने त्याच्या ‘कुछ कुछ होता है’मधील भूमिकेसाठी सर्वांत आधी ऐश्वर्याला विचारलं होतं. नंतर ती भूमिका राणी मुखर्जीने साकारली. या चित्रपटासाठी करणने शाहरुख खान आणि काजोल यांना निश्चित केलं होतं. मात्र तिसऱ्या भूमिकेसाठी अभिनेत्री शोधणं त्याच्यासाठी खूप अवघड होतं.

“मी प्रत्येकाला त्या भूमिकेसाठी विचारलं होतं. मी त्या चित्रपटासाठी अक्षरश: भिकारी बनलो होतो. राणी मुखर्जीच्या भूमिकेसाठी आठ अभिनेत्रींनी आधीच नकार दिला होता. मला वाटलं होतं जर कोणीच होकार नाही दिला तर मलाच शॉर्ट स्कर्ट घालून ती भूमिका साकारावी लागेल. कथा ऐकल्यानंतर ऐश्वर्या रायशिवाय कोणीही मला परत फोन केला नाही”, असा खुलासा करणने एका कार्यक्रमात केला होता.

हे सुद्धा वाचा

1999 मध्ये ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्यानेही भूमिका नाकारण्याविषयीचा खुलासा केला होता. ती म्हणाली, “कुछ कुछ होता है या चित्रपटासाठी करणने मला विचारलं होतं. पण माझ्या तारखा आरके बॅनरअंतर्गत बनणाऱ्या चित्रपटासाठी ठरलेल्या होत्या. त्याहीपेक्षा कुछ कुछ होता है हा चित्रपट काजोलविषयी अधिक आहे. यात काहीच दुमत नाही आणि राणी मुखर्जीनेही खूप चांगलं काम केलंय. जर मी हा चित्रपट केला असता तर लोक म्हणाले असते, पहा ऐश्वर्याने तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांत जे केलं, तेच ती पुन्हा करतेय. तिचे केस एकदम सरळ आहेत, मिनी स्कर्ट्स घातलाय आणि कॅमेरासमोर अत्यंत ग्लॅमरस लूक दिसतोय. मला माहितीये, जर मी कुछ कुछ होता है हा चित्रपट केला असता तर लोकांनी मला ठेचून मारलं असतं.”

‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट आजही अनेकांच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी या तिघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.