Aishwarya Rai च्या नणंदेला प्रचंड आवडायचा सलमान खान, व्यक्त केल्या मनातील भावना, पण…
Aishwarya Rai: 'सलमान खान मला प्रचंड आवडतो, त्याला पाहण्यासाठी मी...', जेव्हा ऐश्वर्या रायच्या नणंदेने सलमान खान याच्याबद्दल व्यक्त केल्या भावना..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता बच्चन हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा...
महानायक अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन हिने कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी, श्वेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. श्वेता अभिनेत्री नसली तरी, अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत तिचे जवळचे संबंध आहेत. रिपोर्टनुसार, एक काळ असा होता, जेव्हा श्वेता बच्चन हिने अभिनेता सलमान खान याच्यासाठी असलेल्या मनातील भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या होत्या. ज्यामुळे श्वेता तुफान चर्चेत आली होती. तारुण्यात श्वेता हिला सलमान खान प्रचंड आवडायचा. स्वतःच्या भावनांचा खुलासा श्वेता हिने करण जोहर याच्या शोमध्ये केला होता.
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये श्वेता हिने मोठा खुलासा केला होता. श्वेता कायम आई जया आणि वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत सलमान खान याच्या सिनेमाच्या सेटवर अभिनेत्याला भेटण्यासाठी जायची. शोमध्ये करण याने श्वेताला एक प्रश्न विचारला ‘अभिनेत्यांना त्यांच्या लूकनुसार रँक कर…’ तेव्हा श्वेता हिने अभिनेता सलमान खान याचं नाव घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान श्वेताचा क्रश होता. ती झोपेत देखील कॅप जवळ घेऊन झोपायची जी भाईजानने ‘मैंने प्यार किया’ सिनेमात घातली होती. ती कॅप अभिषेक बच्चन बहिणीसाठी घेऊन आला होता.
सलमान खान – ऐश्वर्या राय
बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेता असलेल्या सलमान खान याच्या आयुष्यात ऐश्वर्या राय आहे. ‘हम दिल दे चुके समन’ सिनेमातून दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील दोघांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगत असतात.
सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर, ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेत बच्चन याला डेट केलं आणि काही वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तर श्वेता बच्चन हिचं लग्न उद्योजक निखिल नंदा यांच्यासोबत झालं. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि श्वेता यांच्यामध्ये वाद असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ऐश्वर्या हिची एक सवय नणंद श्वेता हिला बिलकूल आवडत नाही. ऐश्वर्या कधीच मेसेजचा रिप्याल लवकर करत नाही… अशी तक्रार श्वेता हिने केली होती.
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.