अभिताभ बच्चन यांची सावत्र आई कोण? बिग बी म्हणाले, ‘पहिल्या बायकोच्या निधनानंतर माझे वडील…’
Amitabh Bachchan on Step Mother: 'पहिल्या बायकोच्या निधनानंतर माझे वडील...', जेव्हा सावत्र आईबद्दल अमिताभ बच्चन यांनी केला मोठा खुलासा, निधनाचं काय होतं कारण? अमिताभ बच्चन अनेकदा खासगी आयुष्यामुळे येतात चर्चेत

Amitabh Bachchan on Step Mother: महानायक अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बच्चन कुटुंब हे बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक असल्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आज बच्चन कुटुंबाबद्दल सर्वांना माहिती आहे. पण अमिताभ बच्चन यांच्या सावत्र आई बद्दल फार कोणाला माहिती नसेल. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर बिग बींचे वडील फार खचले होते.
अमिताभ बच्चन यांचे वडीव हरीवंश राय बच्चन यांच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, 1926 मध्ये हरीवंश राय बच्चन यांनी श्यामा यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांच्या संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या 10 वर्षांनंतर म्हणजे 1936 मध्ये श्यामा बच्चन यांचं निधन झालं. टीबी या आजारामुळे श्यामा यांचं निधन झालं.
पहिल्या पत्नीच्या निधनानंतर हरीवंश राय बच्चन यांनी 1941 मध्ये तेजी सुरी यांच्यासोबत लग्न केलं. हरीवंश राय बच्चन आणि तेजी सुरी यांना दोन मुलं आहेत. अमिताभ बच्चन आणि अजिताभ बच्चन अशी त्यांची नावे आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, ‘कोन बनेगा करोडपती’ शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी सावत्र आईबद्दल सांगितलं होतं. ‘वडिलांचं पहिलं लग्न झालं होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर वडील पूर्णपणे खचले होते. काही वर्षांनंतर त्यांनी कमी संमेलन वैगरे करावे लागले. ज्यामुळे 20 – 30 रुपये मिळायचे.’
‘बरेलीमध्ये त्यांचे घनिष्ट मित्र राहत होते. ज्यामुळे त्यांचं मन कवीतांमध्ये रमू लागलं होतं. त्यांच्या मित्रांनी जेव्हा सांगितलं की, कविता ऐकव… तेव्हा मित्राने स्वतःच्या पत्नीला सांगितलं, अरे तेजी आली आहे तिला येथे बोलवा. कविता ऐकता ऐकता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.’
‘थोड्या वेळानंतर त्यांचा मित्र स्वतः वरमाळा घेवून आला आणि म्हणाले बच्चन वरमाळा तेजी यांच्या गळ्यात घाला… तेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला…’ असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन कामय त्यांच्या खासगी आयुष्यातील किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात.