Dharmendra | जेव्हा धर्मेंद्र यांनी ओलांडल्या सर्व मर्यादा; हेमा मालिनी यांच्यासाठी बूक केलं पूर्ण रुग्णालय

जेव्हा हेमा मालिनी यांच्यासाठी धर्मेंद्र यांनी बूक केलं पूर्ण रुग्णालय; 'ती' गोष्ट कोणाला कळू नये म्हणून..., कारण जाणून व्हाल थक्क; सध्या सर्वत्र 'त्या' घटनेची चर्चा...

Dharmendra | जेव्हा धर्मेंद्र यांनी ओलांडल्या सर्व मर्यादा; हेमा मालिनी यांच्यासाठी बूक केलं पूर्ण रुग्णालय
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 1:52 PM

मुंबई : अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री हेमा मालिनी यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. पण आजही हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही. एवढंच नाही तर, धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने आजही अभिनेत्याच्या दुसऱ्या कुटुंबाला स्वीकारलेलं नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेते सनी देओल यांचा मुलगा करण देओल याचं लग्न झालं. करण याच्या लग्नात पूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. पण हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नव्हत्या. दरम्यान, हेमा मालिनी यांच्याबद्दल एक मोठी गोष्ट समोर आली आहे. जेव्हा धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासाठी पूर्ण रुग्णालय बूक केलं होतं, तेव्हा धर्मेंद्र यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला? या मागचं कारण अखेर समोर आलं आहे.

हेमा मालिनी यांची खास मैत्रीण नीतू कोहली यांनी एका शोमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. जेव्हा ईशा देओल हिचा जन्म होणार होता, तेव्हा हेमा मालिनी प्रेग्नेंट आहेत, ही गोष्ट कोणाला माहिती नव्हतं. नीतू पुढे म्हणाल्या, ‘हेमा मालिनी यांच्या डिलिव्हरी पूर्वी धर्मेंद्र यांनी दुसऱ्या पत्नीसाठी पूर्ण रुग्णालय बूक केलं होतं.. ते एक नर्सिंग होम होतं… ज्यामध्ये १०० रुम होते.’

‘धर्मेंद्र यांनी १०० रुम बूक केले होते. तेव्हा २ नोव्हेंबर १९८१ साली हेमा मालिनी यांनी ईशा देओल हिला जन्म दिला.. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या पहिल्या मुलीचं नाव ईशा देओल असं आहे. हेमा मालिनी यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘हेमा मालिनी: बियोन्ड द ड्रीम गर्ल’ पुस्तकात हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी दडलेल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

‘हेमा मालिनी: बियोन्ड द ड्रीम गर्ल’ पुस्तकात एक किस्सा आहे, जेव्हा धर्मेंद्र यांच्या आई हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. हेमा मालिनी जेव्हा पहिल्यांदा प्रेग्रेंट होत्या तेव्हा धर्मेंद्र यांच्या आई सतवंत कौर सूनेला भेटण्यासाठी आल्या होत्या. हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी जात आहे.. ही गोष्ट सतवंत कौर यांनी कुटुंबाला सांगितलं नाही.

एका डबिंग स्टुडोओमध्ये सतवंत कौर सून हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या आई सतवंत कौर यांच्या पाया पडल्या होत्या. तेव्हा सतवंत कौर यांनी हेमा मालिनी यांना जवळ घेतलं आणि ‘कायम आनंदी राहा…’ असं सांगितलं.. तेव्हा हेमा मालिनी प्रचंड आनंदी झाल्या होत्या..

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.