ज्याच्या कानाखाली वाजवली, धर्मेंद्रच्या मुलीने नंतर त्याच्याशीच केलं लग्न; नेमकं काय घडलं होतं?

ईशा देओल 13 वर्षांची होती, तेव्हापासून भरत तिच्यावर करायचा प्रेम; अचानक एकेदिवशी..

ज्याच्या कानाखाली वाजवली, धर्मेंद्रच्या मुलीने नंतर त्याच्याशीच केलं लग्न; नेमकं काय घडलं होतं?
ज्याच्या कानाखाली वाजवली, धर्मेंद्रच्या मुलीला नंतर त्याच्याशीच करावं लागलं लग्न; काय आहे प्रकरण?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 2:01 PM

मुंबई: बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलचं फिल्मी करिअर आई-वडिलांइतकं यशस्वी होऊ शकलं नाही. ईशाने तिच्या करिअरमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र तिला अपेक्षित प्रसिद्धी किंवा लोकप्रियता मिळू शकली नाही. ईशा देओलने 2002 मध्ये ‘कोई मेरे दिल से पुछे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नुकतीच ती ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमध्ये अजय देवगणसोबत झळकली.

2002 ते 2012 या दहा वर्षांत ईशाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. यापैकी ‘धूम’ आणि ‘नो एण्ट्री’ यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले. मात्र ईशाचे बरेचसे चित्रपट फ्लॉप ठरले. याचदरम्यान 2012 मध्ये तिने व्यावसायिक भरत तख्तानीशी लग्न केलं. या दोघांनी 29 जून 2012 रोजी लग्नगाठ बांधली. मात्र या लग्नाच्या बऱ्याच वर्षांपूर्वी एक किस्सा घडला होता, जो फार क्वचित लोकांना माहीत आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं होतं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार जेव्हा ईशा देओल 13 वर्षांची होती, तेव्हापासून भरत तिच्यावर प्रेम करायचा. हे दोघं शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतात. दोघांची शाळा वेगवेगळी असल्याने फार कमी वेळा त्यांची एकमेकांशी भेट व्हायची. एकदा शाळेतल्या स्पर्धेदरम्यान भरतने अचानक ईशाचा हात धरला होता. यावरून रागावलेल्या ईशाने थेट त्याच्या कानाखालीच वाजवली होती. या घटनेच्या बऱ्याच कालावधीनंतर हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली.

ईशा देओल ही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे. धर्मेंद्र यांनी दोनदा लग्न केलं. प्रकाश कौर यांच्याशी त्यांनी पहिलं लग्न केलं होतं. प्रकाश आणि धर्मेंद्र यांना सनी आणि बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजिता, अजिता या दोन मुली आहेत. तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.