सावत्र आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गेली पण…, ईशाचं धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीबद्दल मोठं वक्तव्य

Dharmendra | धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीसमोर जेव्हा हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुली आल्या, आशीर्वाद घेण्यासाठी गेलेली ईशा म्हणते..., ईशा देओल हिने प्रकाश कौर यांच्यासोबत असलेल्या नात्याचा केलाय मोठा खुलासा... देओल कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत...

सावत्र आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गेली पण..., ईशाचं धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीबद्दल मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 12:01 PM

बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने अद्याप अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केलेला नाही. धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली नसतात. तर हेमा मालिनी यांच्या कोणत्या कार्यक्रमात धर्मेंद्र यांचं पहिलं कुटुंब नसतं. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नींच्या मुलांमध्ये चांगले संबंध आहेत. पण धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी अद्याप ईशा देओल आणि अहाना देओल यांचा स्वीकार केला नाही… असं अनेकदा समोर आलं.

हेमा मालिनी यांच्या बयोग्राफीमध्ये खुद्द ईशा देओल हिने प्रकाश कौर यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं आहे. ईशा हिने सांगितल्यानुसार, काका अजीत देओल यांच्यासोबत ईशा आणि अहाना यांचे चांगले संबंध होते. अजीत देओल दोघींचे प्रचंड लाड देखील करायचे. एक दिवस अचानक अजीत देओल आजारी पडले. तेव्ही अजीत देओल आणि धर्मेंद्र यांचं पहिलं कुटुंब एकत्र राहात होतं.

ईशा म्हणाली, ‘मला काकांना भेटायचं होतं. काका माझे आणि अहानाचे खूप लाड करायचे. आजारी असल्यामुळे ते घरीच होते. आमच्याकडे देखील त्यांच्या घरी जाण्याशिवाय कोणता दुसरा पर्याय नव्हता. ते रुग्णालयात असते तर, आम्ही रुग्णालयात गेलो असतो. अशात आम्ही सनी भैय्या यांना फोन केला आणि पूर्ण व्यवस्था केली.’

हे सुद्धा वाचा

‘मी जेव्हा त्यांच्या घरी गेली तेव्हा त्यांचे (प्रकाश कौर) आशीर्वाद घेण्यासाठी पुढे गेली. तेव्हा त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि तेथून निघून गेल्या…’ सांगायचं झालं तर, अद्यापही प्रकाश कौऱ यांनी धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नाचा स्वीकार केलेला नाही.

अभिनेते सनी देओल यांचा मुलगा करण देओल याच्या लग्नात देखील हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली उपस्थित नव्हत्या. तेव्हा ईशा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण याला वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. ईशा देओल देखील कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

नुकताच ईशा देओल हिचा देखील घटस्फोट झाला आहे. दोन मुलींच्या जन्मानंतर ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अभिनेत्री दोन मुलींचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करत आहे.

ईशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.