हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, ‘धर्मेंद्र यांच्या घरी नाही गेली आणि पहिल्या बायकोला…’
Hema Malini on her Personal Life: 'कधीच धर्मेंद्र यांच्या घरी नाही गेली आणि पहिल्या बायकोला...', खासगी आयुष्याबद्दल हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा...
बॉलिवूडचे सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला. हेमा आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला जवळपास 44 वर्ष पूर्ण झाली आहेत. तरी देखील धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी आजपर्यंत हेमा मालिनी कधीच गेल्या नाहीत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आसतात. सांगायचं झालं तर, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न 1980 मध्ये झालं. तेव्हा धर्मेंद्र यांचं प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झालं होतं आणि त्यांना 4 मुलं देखील होती.
पहिलं कुटुंब असताना देखील धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. दरम्यान, राम कमल मुखर्जी लिखित पुस्तक ‘हेमा मालिनी : बियाॉन्ड द ड्रीम गर्ल’ सिनेमात हेमा मालिनी यांनी खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीबद्दल देखील हेमा मालिनी यांनी मोठा खुलासा केला होता.
हेमा मालिनी म्हणाल्या होत्या, ‘लग्नानंतर मी कधीच धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीला भेटली नाही. लग्नाआधी एखाद्या कार्यक्रमात आमची भेट झाली असेल. लग्नानंतर आमची भेट कधीच झाली नाही. मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता. धर्मेंद्र यांनी माझ्यासाठी आणि माझ्यामुलींसाठी खूप काही केलं आहे. ज्यामुळे आज मी आनंदी आहे…’
‘धर्मेंद्र यांनी वडिलांची भूमिका बजावली आहे. मी आज स्वतःच्या पायांवर भक्कम उभी आहे. मी स्वतःची प्रतिष्ठा कायम ठेवण्यास देखील सक्षम आहे.’ असं देखली हेमा मालिनी म्हणाल्या होत्या. मोठ्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यानंतर खऱ्या आयुष्यात देखील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या.
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. ‘मी प्रकाश कौर यांच्याबद्दल कधी वक्तव्य केलं नाही. पण मी त्यांचा आदर आणि सन्मान करते. एवढंच नाही तर, माझ्या दोन मुली देखील धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाचा सन्मान करतात.’ शिवाय ईशा हिने देखील सांगितलं होतं की, ती अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल यांना राखी बांधते.