Karisma Kapoor | भर पत्रकार परिषदेत जया बच्चन यांनी करिश्माला म्हटलं होतं ‘माझी होणारी सून’; पहा व्हिडीओ

या घटनेच्या बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला होता. अभिषेक आणि करिश्माने 2000 मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.

Karisma Kapoor | भर पत्रकार परिषदेत जया बच्चन यांनी करिश्माला म्हटलं होतं 'माझी होणारी सून'; पहा व्हिडीओ
Jaya Bachchan and Karisma KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 11:11 AM

मुंबई : एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर या दोघांनी साखरपुडासुद्धा केला होता, असं म्हटलं जातं. मात्र लग्नाआधीच या दोघांचं नातं तुटलं. कपूर आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये खास नातेसंबंध सुरू होण्याआधीच सर्वकाही संपुष्टात आलं. जया बच्चन यांनी एका पत्रकार परिषदेत करिश्माचा उल्लेख ‘माझी होणारी सून’ असा केला होता. माध्यमांसमोर त्यांनी करिश्मा आणि अभिषेकचं लग्न जाहीर केलं होतं. यावेळी मंचावर संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बच्चन कुटुंबीयांची पत्रकार परिषद

या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की संपूर्ण बच्चन कुटुंब मंचावर बसलं आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मुलगी श्वेता नंदा पत्रकार परिषदेच उपस्थित आहेत आणि मंचावर जया बच्चन बोलत आहेत. “बच्चन आणि नंदा कुटुंबात आम्ही आणखी एका कुटुंबाचं स्वागत करत आहोत आणि ते म्हणजे कपूर कुटुंब. रणधीर – बबिता कपूर आणि माझी होणारी सून करिश्मा कपूर. वडिलांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेकने आम्हाला दिलेली ही भेट आहे,” अशी घोषणा करत त्या करिश्माला मंचावर बोलावतात. त्याचवेळी करिश्मासुद्धा मंचावर येऊन जया बच्चन यांना मिठी मारते. त्यानंतर अभिषेक आणि अमिताभ बच्चनसुद्धा फोटोसाठी उभे राहतात.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

साखरपुडा का मोडला?

या घटनेच्या बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला होता. अभिषेक आणि करिश्माने 2000 मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या या दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर त्याचं नातं तुटलं. सुनील दर्शन यांनी 2000 मध्ये ‘हां मैने भी प्यार किया’ या चित्रपटासाठी दोघांसोबत काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुनील यांना अभिषेक-करिश्मामधली जवळीक स्पष्ट दिसू लागली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्याचसोबत अभिषेक-करिश्माचं नातंसुद्धा संपुष्टात आलं.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन म्हणाले होते, “अभिषेक-करिश्माच्या नात्याची अफवा नव्हती, ते सत्य होतं. ते दोघं लग्न करणार होते. मी स्वत: त्यांच्या साखरपुड्याला उपस्थित होतो.” या दोघांचं नातं फार काळ टिकणार नाही, याची चुणूक सुनील दर्शन यांना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच लागली होती.

“अभिषेक आणि करिश्मा हे सेटवर नेहमीच एकमेकांशी भांडायचे. या दोघांची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ अशी नव्हती. सतत त्यांच्यात भांडणं व्हायची. कदाचित काही लोकांचं नातं असंच असतं. मला नेहमीच प्रश्न पडायचा की खरंच हे दोघं एकमेकांसाठी बनले आहेत का? अभिषेक आणि करिश्मा दोघं स्वभावाने चांगले आहेत. पण दोघांच्या नशिबात एकत्र राहणं नव्हतं,” असं ते म्हणाले होते.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.