नाना पाटेकर अशा अवस्थेत पोहोचले होते प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी, ‘ती’ घटना अनेक वर्षांनी समोर

Nana Patekar | नाना पाटेकर जुनी आठवण सांगत झाले भावूक, अशा अवस्थेत पोहोचले प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी, त्यानंतर जे काही झालं, ते अनेक वर्षांनंतर समोर..., नाना पाटेकर कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असतात चर्चेत...

नाना पाटेकर अशा अवस्थेत पोहोचले होते प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी, 'ती' घटना अनेक वर्षांनी समोर
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 8:10 AM

झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध, लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत नाना पाटेकर यांचं नाव अव्वल स्थानी आहे. नाना पाटेकर यांचं अभिनय, त्यांचा डायलॉग बोलण्याचा अंदाज, विनोदबुद्धी… इत्यादी गोष्टी चाहत्यांना प्रचंड आवडतात. नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज नाना यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील नाना पाटेकर यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी एक जुना किस्सा सांगितला आहे. एकदा नाना पाटेकर पूर्ण भिजलेल्या अवस्थेत दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले होते. दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचल्यानंतर जे काही झालं ते नाना पाटेकर यांनी अनेक वर्षांनंतर सांगितलं.

नाना पाटेकर म्हणाले, ‘मुसळधार पाऊस पडत होता. भिजलेल्या अवस्थेत दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मला टॉवेल दिला. स्वतःचा कुर्ता मला घालायला दिला. त्यांनी स्वतः माझे ओले झालेले केस पुसले आणि कपडे बदलायला सांगितले…’

पुढे नाना पाटेकर सत्यजीत रे यांच्या एका डायरीचा उल्लेख करत म्हणाले, सत्यजीत रे यांची एक डायरी होती. त्या डायरीमध्ये  दिलीप कुमार यांचं एक पान होतं. त्या डायरीमध्ये दिलीप कुमार यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

यावर नाना म्हणाले, ‘तुम्हाला दुसरा कोणता पुरस्कार हवा आहे…? माझ्याकडे काम करण्याची लायकी नाही, पण त्यांना माझ्यासोबत काम करावसं वाटलं. यापेक्षा अधिक अजून काय हवं आहे. मी खूप भाग्यशाली आहे…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.

सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर नाना पाटेकर यांचं राज्य होतं. ‘क्रांतीवीर’, ‘नटसम्राट’, ‘परिंदा’, ‘वजूद’, ‘टॅक्सी नं. 9 2 11’, ‘वेलकम’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.