राजकारण्यांना काय सल्ला देशील? राहुल गांधींच्या प्रश्नावर शाहरुख खानचं मजेशीर उत्तर

सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये राहुल गांधींनी शाहरुखला एक प्रश्न विचारला आहे. राजकारण्यांना काय सल्ला देशील, या प्रश्नावर शाहरुखने मजेशीर उत्तर दिलं आहे.

राजकारण्यांना काय सल्ला देशील? राहुल गांधींच्या प्रश्नावर शाहरुख खानचं मजेशीर उत्तर
Rahul Gandhi and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 8:25 AM

मुंबई : 16 मार्च 2024 | शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. फिल्म इंडस्ट्रीत त्याने तीन दशकांहून अधिक काळ काम केलंय. सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून त्यात राहुल गांधी यांनी शाहरुखला खास प्रश्न विचारला आहे. “राजकारण्यांना तू कोणता सल्ला देशील?” असा सवाल राहुल गांधींनी किंग खानला केला. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते आणि तेसुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते.

शाहरुखचं उत्तर

राहुल गांधींच्या प्रश्नावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “हा प्रश्न खूप साधा आहे याचा मला आनंद आहे (हसतो). मी माझ्या उदरनिर्वाहासाठी खोटं बोलतो आणि इतरांची फसवणूक करतो. मी एक अभिनेता असल्याने माझं संपूर्ण आयुष्य हा एक शोच आहे. माझ्या आत काहीही ठोस असं नाही. पण मी हे नक्की सांगू इच्छितो की देश चालवणाऱ्या किंवा ज्यांच्या मनात देश चालवण्याची इच्छा आहे अशा लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. जे देशासाठी काम करतात ते नि:स्वार्थ सेवा करत आहेत आणि हे काम करणाऱ्या प्रत्येकाने ते अत्यंत प्रामाणिकपणे करावं अशी माझी इच्छा आहे.”

हे सुद्धा वाचा

उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट

“ही अत्यंत नि:स्वार्थ सेवा आहे. त्यामुळे हे काम अत्यंत प्रामाणिकपणे करा आणि आपल्या देशाचा अभिमान बाळगा. या देशावर प्रेम करा आणि आपला देश हा अत्यंत अद्भुत आहे त्यामुळे टेबलाखालून पैसे घेऊ नका. भ्रष्टाचार करू नका किंवा कोणतीही अप्रिय घटना करू नका. जर आपण योग्य काम केलं तर आपण सर्व पैसे कमावू शकू आणि आपण सर्वजण आनंदी राहू शकू. आपण सर्व मिळून या देशाला महान आणि अभिमानी राष्ट्र बनवू शकू”, असं शाहरुख म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे पुन्हा वळत शाहरुख पुढे म्हणाला, “म्हणून मी सर्व राजकारण्यांना सल्ला देतो की कृपया यथार्थपणे शक्य तितकं प्रामाणिक राहा.”

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.