रतन टाटा यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे उधार मागितले तेव्हा, ‘माझ्याकडे पैसे नाहीत…’
Ratan Tata - Amitabh Bachchan: 'माझ्याकडे पैसे नाहीत...', रतन टाटा यांनी परदेशात अमिताभ बच्चन यांच्याकडे मागितले होते उधार पैसे..., बिग बींंनी सांगितला जुना किस्सा... अनेक वर्षांनंतर अमिताभ बच्चन यांनी सांगितली आठवण...
Ratan Tata – Amitabh Bachchan: भारतीय उद्योग विश्वातील लिजेंड असणारे रतन टाटा यांचं 9 ऑक्टोंबर रोजी निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा आज आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी आजही जिवंत आहेत. नुकताच महानायक अमिताभ बच्चन यांनी रतन टाटा यांच्यासोबत असलेली एक आठवण सांगितली. ‘कोन बनेगा करोडपती 16’ शोमध्ये बिग बी म्हणाले ‘रतन टाटा यांनी एकत संकोच न करता पैसे मागितले होते.’ ‘केबीसी 16’ चा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिग बी अभिनेते बोमन ईराणी आणि कोरिओग्राफर फराह खान यांनी रतन टाटा यांची आठवण सांगताना दिसत आहेत.
रतन टाटा यांची आठवण सांगत बिग बी म्हणाले, ‘एकदा आम्ही दोघे एकाच फ्लाईटमध्ये होतो. आम्ही हिथ्रो विमानतळावर उतरलो. उतरल्या नंतर रतन टाटा यांनी घ्यायला येणारे लोकं दिसले नाहीत किंवा कुठे दुसरीकडे गेले असतील. मी त्यांना पाहिलं आणि ते फोन करण्यासाठी फोन बूथच्या दिशेने गेले…’
View this post on Instagram
त्याच्यानंतर जे काही झालं ते मी कधीच विसरु शकणार नाही असं बिग बी म्हणाले, ‘थोड्या वेळानंतर रतन टाटा माझ्याकडे आले आणि म्हणाले, अमिताभ तुमच्याकडून मला काही पैसे उधार मिळतील का? माझ्याकडे फोन करण्यासाठी पैसे नाहीत…’ यावर हैराणी व्यक्त करत बिग बी म्हणाले, ‘इतके मोठे उद्योजक इतक्या साध्या पद्धतीत माझ्यासोबत बोलले…’, खास आठवण सांगताना बिग बी देखील भावूक झाले.
सांगायचं झालं तर, अनेकांच्या प्रेरणा स्थानी रतन टाटा आहे. उद्योग क्षेत्राच्या पलिकडे जात रतन टाटा यांनी अनेकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले. त्यांनी दोन दशके टाटा समूहाचे नेतृत्व केलं.
रतन टाटा यांनी बऱ्याच लोकांवर खोल प्रभाव टाकला आणि त्यांची नम्रता व्यावसायिक जगाच्या पलीकडे त्यांच्या वैयक्तिक संबंध आणि वागणुकीपर्यंत पसरली. त्यांनी दोन दशके टाटा समूहाचे नेतृत्व केले. टाटांनी एक असा वारसा तयार केला ज्याने मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत अनेक क्षेत्रांवर आपली छाप सोडली. पण त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.