Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rekha | ‘माझा सडलेला भूतकाळ’; जेव्हा रेखा यांनी विनोद मेहरा यांच्या आईसाठी म्हटली ‘ही’ गोष्ट

यासीर उस्मान यांच्या 'रेखा : ॲन अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात रेखा आणि अभिनेते विनोद मेहरा यांच्या लग्नाचा उल्लेख केला आहे. या पुस्तकानुसार विनोह मेहरा यांनी रेखाशी गुपचूप लग्न केलं होतं. कोलकातामधल्या एका मंदिरात दोघांनी लग्नगाठ बांधली होती.

Rekha | 'माझा सडलेला भूतकाळ'; जेव्हा रेखा यांनी विनोद मेहरा यांच्या आईसाठी म्हटली 'ही' गोष्ट
रेखा
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 1:19 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा या त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिल्या. अफेअरपासून लग्नापर्यंत… रेखा यांचं खासगी आयुष्य म्हणजे जणू रहस्यच आहे. त्यांच्या अफेअर आणि लग्नाबद्दलचे किस्से आजही चवीने चघळले जातात. यासीर उस्मान यांच्या ‘रेखा : ॲन अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात रेखा आणि अभिनेते विनोद मेहरा यांच्या लग्नाचा उल्लेख केला आहे. या पुस्तकानुसार विनोह मेहरा यांनी रेखाशी गुपचूप लग्न केलं होतं. कोलकातामधल्या एका मंदिरात दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नानंतर रेखाला घेऊन विनोद जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांच्या आईच्या तळपायाची आग मस्करात पोहोचली होती.

नवविवाहित रेखा जेव्हा त्यांच्या सासूचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढे गेल्या, तेव्हा त्यांनी धक्का मारून दूर केलं. इतकंच नव्हे तर विनोद मेहरा यांनी पत्नी किंवा आई या दोघांपैकी एकाचीच निवड करावी, असं सांगण्यात आल होतं. अखेर हा वाढता वाद पाहत त्यांनी रेखा यांना घरी परतण्यास सांगितलं होतं. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, रेखा यांनी त्यांच्या सासूला खुश करण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते, मात्र त्यात त्यांना यश मिळालंच नाही.

विनोद मेहरा यांचीही अशी इच्छा होती की रेखा यांनी स्वत:ला बदलावं. मात्र जेव्हा हे भांडण वाढत गेलं, तेव्हा रेखा यांनी थेट झुरळ मारण्याचं औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र नंतर एका पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं की, “मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नव्हता. तर माझ्या जेवणात झुरळ आल्याने मला फूड पॉईजनिंग झालं होतं.” बऱ्याच प्रयत्नांनंतरही जेव्हा विनोद मेहरा आणि रेखा यांच्या नात्यातील कटुता मिटली नाही, तेव्हा दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दोन महिन्यांतच दोघांचं नातं संपुष्टात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

विनोद मेहरा यांच्याशी विभक्त झाल्यानंतर रेखा यांनी 1973 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं, “त्यांची आई कधीच माझी प्रशंसक नव्हती. त्यांच्यासाठी मी नेहमीच एक बदनाम अभिनेत्री होते. माझा सडलेला भूतकाळ आहे, असं त्या मानतात. मी जेव्हा विनोद यांना आई आणि प्रेम यापैकी एक गोष्ट निवडण्यास सांगितली, तेव्हा त्यांनी आईला निवडलं. विनोद यांच्यामुळे मी सुरुवातीला त्यांच्या आईला सहन केलं. मात्र आता मी कोणतीच गोष्ट सहन करणार नाही.”

'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले.
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?.
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?.
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....