Kapoor family | लेकासोबत असलेल्या नात्याचा ऋषी कपूर यांना का व्हायचा पश्चाताप? अखेर कारण समोर
रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्यामध्ये कसं होतं नातं? ऋषी कपूर यांचं लेकासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठी गोष्ट अनेक वर्षांनंतर समोर आलीच...

मुंबई | कपूर कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सतत चाहत्यांसमोर येत असतात. कपूर कुटुंब हे बॉलिवूडच्या सर्वात प्रतिष्ठीत कुटुंबांपैकी एक आहे. कपूर कुटुंबातील सदस्य कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आज जिवंत नसले तरी, त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. ऋषी कपूर यांच्या जीवनावर आधारित ‘खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेंसर्ड’ पुस्तक २०१७ रोजी लॉन्च झालं. ज्यामुळे लोकांना ऋषी कपूर अधिक कळले. पुस्तकात ऋषी कपूर यांनी त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. ज्यामुळे अभिनेत्याच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या. एवढंच नाही तर, ऋषी कपूर यांनी मुलगा रणबीर कपूर याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल देखील मोठा खुलासा केला.
ऋषी कपूर यांनी पुस्तकात सांगितले की रणबीरच्या रचनात्मक निवडींमध्ये त्यांची कोणतीही भूमिका नव्हती. एक वडील म्हणून ऋषी कपूर यांनी कधीही मुलाच्या करियरमध्ये देखील हस्तक्षेप केला नाही. पण ऋषी कपूर यांनी आपण कठोर वडील असल्याची कबुली दिली. ज्यामुळे रणबीर त्याची आई नीतू कपूर यांच्या फार जवळ होता.
ऋषी कपूर पुढे म्हणाले होते की, ‘मी रणबीरचा कधीही मित्र होवू शकलो नाही. आमच्या दोघांमध्ये अंतर होतं. जे कामय एका पिता – पुत्राच्या नात्यात असतं. रणबीर आणि मी एकमेकांना पाहायचो पण कधीही आम्ही एकमेकांना अनुभवलं नाही. कधीकधी मला वाटलं की मी माझ्या मुलाचा मित्र होणं चुकवलं आहे… मी एक कठोर वडील होतो, कारण एका वडिलाने कठोरच असायला हवं असं माझ्यावर बिंबवण्यात आलं होतं..’ (rishi kapoor unknown facts)
वडिलांसोबत असलेल्या नात्यावर रणबीर कपूर याने एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं. अभिनेता म्हणाला, ‘माझे वडील माझे मित्र नसून वडीलच आहेत. मी त्यांच्यावर कधी पलटवार करु शकत नाही, किंवा त्यांच्यासोबत कधी थट्टा – मस्करी करु शकत नाही.’ लेकाचा मित्र न होवू शकल्याचा पश्चाताप ऋषी कपूर यांना व्हायचा.
ऋषी कपूर यांचं २०२० साली निधन झाले. या काळामध्ये त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी त्यांना खूप साथ दिली. परंतू ऋषी कपूर यांच्या जाण्यांनी नीतू कपूर यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. कपूर कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात ऋषी कपूर यांची कमतरता कुटुंबाला जाणवते. (rishi kapoor on ranbir kapoor)