Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता ब्रेकअप करायला हवं..; रितेशने जिनिलिया पाठवला मेसेज अन् पुढे जे घडलं..

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया डिसूझा-देशमुख ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या लग्नाला 12 वर्षे झाली असून त्यांना दोन मुलं आहेत.

आता ब्रेकअप करायला हवं..; रितेशने जिनिलिया पाठवला मेसेज अन् पुढे जे घडलं..
रितेश आणि जिनिलिया देशमुखImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 12:57 PM

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा हे बॉलिवूडमधील सर्वांच लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. प्रेम असावं तर असं.. हे दोघांकडे पाहून अनेकांना वाटतं. आधी मैत्री, मग प्रेम आणि लग्न.. अशी रितेश-जिनिलियाची परिपूर्ण प्रेमकहाणी अनेकांनाच माहीत आहे. पण या दोघांच्याही नात्यात अनेक चढउतार आले आहेत. रितेश आणि जिनिलियाने या चढउतारांचा सामना एकत्र करत नात्यातील प्रेम आणि आदर आणखी दृढ केला. हे दोघं जेव्हा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पाहुणे म्हणून पोहोचले, तेव्हा त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला होता. जिनिलियाला डेट करत असताना रितेशने एकेदिवशी तिला ब्रेकअपचा मेसेज केला होता. हा मेसेज पाहून जिनिलियाला आश्चर्याचा धक्काच बसला होता.

रितेशने अचानक एकेदिवशी जिनिलियाला ब्रेकअपबद्दलचा मेसेज पाठवला होता. खरंतर रितेश तिच्यासोबत प्रँक करत होता. त्याच उद्देशाने त्याने तो मेसेज केला होता. जिनिलिया त्यावर कशी प्रतिक्रिया देईल, हे त्याला पहायचं होतं. पण झालं उलटंच. जिनिलियाला रितेशची मस्करी समजली नाही आणि तिने तो मेसेज गांभीर्याने घेतला. ती खूप नाराज झाली होती. त्यावेळी दोघांचं नातं खरंच ब्रेकअपवर आलं होतं. शेवटी कसंबसं रितेशने हा आपला प्रँक असल्याचं जिनिलियाला समजावलं. त्यानंतर दोघांमध्ये कधीही वेगळं होण्याचा विषय निघाला नाही. त्या घटनेनंतर रितेशने पुन्हा कधीच तिच्यासोबत प्रँक करण्याचा प्रयत्न केला नाही. रितेश आणि जिनिलिया एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतात, याचाही खुलासा दोघांनी कपिल शर्माच्या शोमध्ये केला होता. रितेश जिनिलियाला ‘जिनी’ म्हणून हाक मारतो. तर ती त्याला ‘ढोलू’ म्हणते.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर रितेश आणि जिनिलियाची पहिल्यांदा भेट झाली होती. तेव्हा रितेश हा अत्यंत बिघडलेला मुलगा आहे, असं जिनिलियाला वाटलं होतं. मात्र शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. रितेश आणि जिनिलियाने लग्नापूर्वी जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.

रितेश आणि जिनिलियाने 2002 मध्ये डेटिंगला सुरुवात केली होती आणि 2003 मध्ये एका चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांना लग्नाचा सीन करावा लागला होता. “भविष्यात काय होईल, माहीत नाही. पण या क्षणाचा आनंद आपण घ्यायला हवा, असा विचार करत आम्ही तो सीन हसण्यावारी नेला आणि पुढे गेलो,” अशी आठवण रितेशने या शोमध्ये सांगितली.

लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं.
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण.
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.