Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृताला पोटगी म्हणून सैफने दिली होती तब्बल इतकी मोठी रक्कम; म्हणाला “माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं”

सैफ आणि करीना 'टशन' या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी ऑक्टोबर 2012 मध्ये लग्न केलं. सैफ आणि करीनाला दोन मुलं आहेत. तर सारा आणि इब्राहिम यांचंही करीनासोबत चांगलं नातं पहायला मिळतं.

अमृताला पोटगी म्हणून सैफने दिली होती तब्बल इतकी मोठी रक्कम; म्हणाला माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं
Saif Ali Khan and Amrita SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 3:26 PM

मुंबई : अभिनेता सैफ अली खान सध्या करीना कपूरसोबतच्या वैवाहिक आयुष्यात फार खुश आहे. या दोघांना तैमुर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत. सैफचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झालं होतं. अमृता आणि सैफला सारा अली खान आणि इब्राहिम खान ही दोन मुलं आहेत. लग्नाच्या वेळी सैफ फक्त 21 वर्षांचा होता आणि त्यावेळी अमृता त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. मात्र 13 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर 2005 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सैफ त्याच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता.

2004 मध्ये सैफ आणि अमृताने घटस्फोट घेतला. वैवाहिक आयुष्यात अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा खुलासा सैफने एका मुलाखतीत केला होता. “मी नालायक आहे असं मला सतत म्हटलं गेलं. माझ्या आई आणि बहिणीवरूनही सतत मला टोमणे मारले गेले. मला शिवीगाळ करण्यात आली”, असा धक्कादायक खुलासा त्याने केला होता. घटस्फोटानंतर सैफला सारा आणि इब्राहिम या दोन्ही मुलांचा ताबा हवा होता, मात्र त्यासाठी भांडणं त्याला पटलं नाही. अमृताने मुलांची नावं सारा सिंग किंवा इब्राहिम सिंग अशी ठेवली तरी मला काहीच समस्या नाही, असंही त्याने म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

घटस्फोटानंतर अमृताला दिल्या जाणाऱ्या पोटगीबाबतही त्याने या मुलाखतीत खुलासा केला होता. पोटगी म्हणून सैफला पाच कोटी रुपये द्यायचे होते आणि त्यापैकी अडीच कोटी रुपये त्याने आधीच अमृताला दिले होते. त्याचप्रमाणे इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत सैफला दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागले.

पोटगीबद्दल सैफ म्हणाला, “मी काही शाहरुख खान नाही. माझ्याकडे एवढा पैसा नव्हता. उरलेले सर्व पैसे मी तिला देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. मी जाहिराती, चित्रपट आणि स्टेज शोजमधून जेवढा पैसा कमावला होता, ते सर्व माझ्या मुलांसाठी मी अमृताला देऊन टाकलं. माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. एकवेळ मला लाजेनं मरू द्या. पण मला सतत अपराधीपणाच्या भावनेनं मारू नका. कारण अखेर मी अशा नात्यापासून दूर जाण्याचं धैर्य केलं होतं.”

सैफ आणि करीना ‘टशन’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी ऑक्टोबर 2012 मध्ये लग्न केलं. सैफ आणि करीनाला दोन मुलं आहेत. तर सारा आणि इब्राहिम यांचंही करीनासोबत चांगलं नातं पहायला मिळतं.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.