सलमान खानने जेव्हा शाहरुख खानवर केला गोळीबार…, लोकांना वाटलं…

Salman Khan - Shah Rukh Khan: सलमान खान याने गोळीबार करताच खाली कोसळला शाहरुख खान... त्यानंतर जे झालं ते..., लोकांना वाटलं..., सलमान खान आणि शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत

सलमान खानने जेव्हा शाहरुख खानवर केला गोळीबार..., लोकांना वाटलं...
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 8:26 AM

Salman Khan: बॉलिवूडचे दोन सुपरस्टार म्हणजे अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. दोघांमध्ये फार चांगली मैत्री देखील आहे. शिवाय शाहरुख – सलमान यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम देखील केलं आहे. पण दोघांच्या ‘करण अर्जुन’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘करण अर्जुन’ सिनेमा चाहत्यांना प्रचंड आवडला. आजही सिनेमातील गाणी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. सिनेमा 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता.

सिनेमात शाहरुख – सलमान यांनी एकमेकांच्या भावाची भूमिका साकारली होती. सिनेमाची शुटिंग सुरु होती तेव्हा दोघे सेटवर प्रचडं मस्ती करायचे. दोघांनी मिळून एकदा असं काही केलं ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. शिवाय दोघांमध्ये नक्की काय सुरु आहे लोकांना कळत देखील नव्हतं.

जुन्या मुलाखतीत सलमान खान याने किस्सा सांगितला होता. ‘शुटिंगसाठी रिकाम्या बंदुका सेटवर असायच्या. रिकाम्या बंदुकांसोबत आम्ही प्रँक केलं होता. पार्टी सुरु होती. शाहरुखला म्हणालो मी तुला डान्ससाठी बोलवेल पण तू यायचं नाही… पुन्हा मी तुला डान्ससाठी बोलवेल तू यायचं नाही… यामुळे आपल्यात वाद होतील. मी तुझ्यावर रिकाम्या बंदुकने गोळीबार करेल आणि तू खाली पडशील…’ असा प्लॅन शाहरुख – सलमान यांनी केला.

हे सुद्धा वाचा

सलमान खानने जसं सांगितलं होतं तसं शाहरुख खानने केलं होतं. सलमानने बोलवल्यानंतर शाहरुख आला नाही आणि दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर रिकाम्या बंदुकने सलमानने शाहरुखवर गोळीबार केला. शाहरूख खान खाली जमीनीवर कोसळला… लोकांना वाटलं खरंच किंग खानला गोळी लागली आहे.

शहरुख खान खाली पडल्यानंतर प्रत्येकाला मोठा धक्का बसला. पण शाहरुख उठत नसल्याचं पाहून सलमान खान देखील घाबरला. काय होतंय सलमानला देखील कळत नव्हतं… अखेर शाहरुख झोपला आहे… असं सर्वांना समजलं. सकाळी 6 पासून शुटिंग करत असल्यामुळे शाहरुख प्रचंड थकला होता. म्हणून किंग खान झोपला.

पुन्हा प्रदर्शित होणार ‘करण अर्जुन’ सिनेमा

मोठ्यांपासून लहान मुलांना देखील सलमान खान – शाहरुख खान स्टारर ‘करण अर्जुन’ सिनेमा माहिती आहे. सिनेमा पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण अर्जुण’ सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.