Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐनवेळी अवॉर्ड शोमध्ये सलमानची फसवणूक; वडील झाले नाराज, रागाच्या भरात ‘दबंग’ खानने उचललं हे पाऊल

सलमानचं ऐकून घेतल्यानंतर त्या व्यक्तीने सलमानला परफॉर्म करण्यास सांगितलं. त्यावर त्याने साफ नकार दिला. नकार ऐकल्यानंतर संबंधित व्यक्ती मिश्किलपणे हसली आणि म्हणाली, "तुझ्या या परफॉर्मन्ससाठी मी तुला किती पैसे देणार हे तुला माहितीये."

ऐनवेळी अवॉर्ड शोमध्ये सलमानची फसवणूक; वडील झाले नाराज, रागाच्या भरात 'दबंग' खानने उचललं हे पाऊल
Salman Khan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 11:41 AM

मुंबई : अभिनेता सलमान खान त्याच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावामुळे बॉलिवूडचा ‘दबंग’ खान म्हणून ओळखला जातात. इंडस्ट्रीत सलमानशी पंगा घेणं म्हणजे स्वत:वर संकट ओढावून घेण्यासारखं असल्याचं म्हटलं जातं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने फिल्मफेअर अवॉर्ड शोची पोलखोल केली. या पुरस्कार सोहळ्यात त्याला वडील सलिम खान आणि इतर कुटुंबीयांसोबत आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सलमानऐवजी दुसऱ्या अभिनेत्याला देण्यात आला. त्यानंतर सलमानने काय केलं, याविषयीचा खुलासा त्याने केला.

यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन सलमान करणार आहे. मुंबईत येत्या 27 एप्रिल रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सलमानने त्याच्यासोबत घडलेला हा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “मला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बोलावण्यात आलं होतं आणि मला पुरस्कार मिळेल असं सांगण्यात आलं होतं. मी माझ्या वडिलांसोबत तिथे गेलो. माझ्या वडिलांनी सूट घातला होता, माझे इतर कुटुंबीय तिथे उपस्थित होते. नामांकनं जाहीर केल्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याला पुरस्कार सलमान खानला… असं म्हणताच क्षणी मी जागेवर उभा राहिलो. पण त्यानंतर दुसरं नाव घेतलं गेलं आणि तो पुरस्कार जॅकी श्रॉफ यांना मिळाला. माझे बाबा मला म्हणाले, हे काय आहे?”

“त्या पुरस्कार सोहळ्यात मला पहिल्यांदाच परफॉर्मही करण्यास सांगितलं गेलं होतं. त्यामुळे मी स्टेजच्या मागे गेलो आणि म्हणालो, मी परफॉर्म करणार नाही, कारण माझ्यासोबत जे घडलं ते योग्य नाही. मला काही फरक पडत नाही. जॅकी श्रॉफ यांना पुरस्कार मिळाला याचा मला आनंदच होता. परिंदामध्ये त्यांनी उत्तम काम केलं होतं. पण तुम्ही माझ्यासोबत असं करायला पाहिजे नव्हतं. तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र आहात, तुम्ही असं करायला पाहिजे नव्हतं”, असं सलमानने पुढे सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सलमानचं ऐकून घेतल्यानंतर त्या व्यक्तीने सलमानला परफॉर्म करण्यास सांगितलं. त्यावर त्याने साफ नकार दिला. नकार ऐकल्यानंतर संबंधित व्यक्ती मिश्किलपणे हसली आणि म्हणाली, “तुझ्या या परफॉर्मन्ससाठी मी तुला किती पैसे देणार हे तुला माहितीये.” हे ऐकून सलमानने विचारलं, “किती देणार?” त्या व्यक्तीने आकडा सांगितल्यानंतर सलमानने त्याच्या पाच पट मोठी रक्कम मागितली. एवढी मोठी रक्कम देण्यास होकार दिल्यानंतर त्या व्यक्तीने सलमानला याबद्दल कोणालाच काही न सांगण्याचा इशारा दिला. मात्र सलमान त्यांचा ऐकणारा नव्हताच. “तू चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतलास”, असं म्हणून सलमान तिथून निघून गेला.

1990 मध्ये जॅकी श्रॉफने ‘परिंदा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला होता.

प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.