Salman Khan: ..जेव्हा ‘कॉफी विथ करण’मध्ये सलमान म्हणाला, “मी Virgin आहे” अन..

आता कॉफी विथ करणचा सातवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच त्यातील काही किस्सेसुद्धा चर्चेत आले आहेत. या शोच्या चौथ्या सिझनमध्ये बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानने (Salman Khan) हजेरी लावली होती.

Salman Khan: ..जेव्हा 'कॉफी विथ करण'मध्ये सलमान म्हणाला,  मी Virgin आहे अन..
Salman KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 1:11 PM

‘कॉफी विथ करण’चा (Koffee With Karan) सातवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यंदा हा सिझन टेलिव्हिजनवर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याविषयी त्यांना बोलतं करतो. कधी वादामुळे तर कधी खासगी आयुष्यातील खुलासे केल्यामुळे हा शो चर्चेत राहिला. आता कॉफी विथ करणचा सातवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच त्यातील काही किस्सेसुद्धा चर्चेत आले आहेत. या शोच्या चौथ्या सिझनमध्ये बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानने (Salman Khan) हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याविषयी असं काही विधान केलं होतं, ज्याची नंतर जोरदार चर्चा झाली.

1 डिसेंबर 2013 रोजी सलमानने या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना सलमानने चक्क ‘मी व्हर्जिन आहे’ असं म्हटलं होतं. “मी स्वत:ला माझ्या भावी आयुष्यातील पत्नीसाठी वाचवून ठेवतोय” असं सलमानने म्हटलं होतं. त्यावर करणने त्याला थेट विचारलं, “तू व्हर्जिन आहेस का?” या प्रश्नाचं उत्तर सलमानने होकारार्थी दिलं होतं. यावेळी सलमानसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे दिग्दर्शकसुद्धा उपस्थित होते. माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, असं सलमान म्हणताच दिग्दर्शकाने मस्करीत त्याला विचारलं, “बेनिफिट्सशिवाय फ्रेंड्स का?” त्यांना उत्तर देताना सलमान म्हणाला, “नो बेनिफिट्स”. हे ऐकून करण जोहर आणि उपस्थित प्रेक्षकांना हसू अनावर झालं. करणचा कॉफी विथ करण हा शो काही वादांसाठीही चर्चेत आला. अभिनेत्री कंगना रनौतने याच शोदरम्यान करणवर घराणेशाहीचा आरोप केला होता. तेव्हापासूनच करण आणि कंगना यांच्यातील वाद सुरू झाला.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

सलमान खानच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, तो सध्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर ‘टायगर 3’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाल्याचीही जोरदार चर्चा होती. त्यानंतर त्याची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली. मात्र आपण सलमानला धमकी दिलं नसल्याचं तुरुंगात असलेल्या लॉरेन्सने पोलिसांच्या चौकशीदरम्यान स्पष्ट केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.