जेव्हा सानिया मिर्झाने व्यक्त केली रणबीरशी लग्न करण्याची इच्छा
चॅट शोमध्ये सानियाने घेतलं होतं रणबीर कपूरचं नाव; वाचा काय म्हणाली?
मुंबई- भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सानियाने पती आणि पाकिस्तान क्रिकेट टीमचा प्रसिद्ध खेळाडू शोएब मलिकला घटस्फोट दिला आहे. सानिया आणि शोएबच्या जवळच्या मित्राने याबद्दलची माहिती दिली. सानिया मिर्झाचं खासगी आयुष्य याआधीही अनेकदा चर्चेत आलं आहे. एकेकाळी तिने अभिनेता रणबीर कपूरशी लग्नाची इच्छा बोलून दाखवली होती. सानियाने नॅशनल टेलिव्हिजनवर या गोष्टीची कबुली दिली होती.
इतकंच नाही तर सानियाचं नाव अभिनेता शाहिद कपूरशीही जोडलं गेलं होतं. मात्र या दोघांनी माध्यमांसमोर कधीच त्याची कबुली दिली नव्हती. कॉफी विथ करणच्या चॅट शोमध्ये जेव्हा सानियाने हजेरी लावली होती. तेव्हा सूत्रसंचालक करण जोहरने तिला याविषयी प्रश्न विचारला होता. मात्र त्या चर्चांविषयी मला काहीच माहीत नाही, असं म्हणत तिने तो प्रश्न टाळला होता.
View this post on Instagram
याच शोमध्ये करणने तिला प्रश्न विचारला होता की, “बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्याशी तू लग्न करू इच्छितेस? कोणाशी हुकअप करू शकतेस आणि कोणाला मारू शकतेस?” त्यावर उत्तर देताना सानिया म्हणाली, “मला रणबीरशी लग्न करायला आवडेल, रणवीर सिंगसोबत हुकअप आणि शाहिद कपूरला मारू इच्छिते.” त्यावेळी सानियाच्या या उत्तराची खूप चर्चा झाली होती.
सानियाने 2010 मध्ये शोएब मलिकशी लग्न केलं होतं. तर 2018 मध्ये सानियाने मुलाला जन्म दिला. गेल्या काही महिन्यांपासून सानिया आणि शोएब यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. याची चर्चा पाकिस्तान आणि भारतात होत होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाला असून लवकरच हे दोघे कायदेशीर बाबींची पूर्तता करून विभक्त होणार आहेत.