Satish Kaushik | प्रेग्नंट नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी; पण..

एनसीआरमध्ये असताना सतीश कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्यांचं पार्थिव सध्या गुरुग्राममधील फोर्टीज रुग्णालयात आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचं पार्शिव मुंबईत आणलं जाईल.

Satish Kaushik | प्रेग्नंट नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी; पण..
Neena Gupta and Satish KaushikImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 9:25 AM

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांचं वयाच्या 66 व्या वर्षी निधन झालं. 1985 मध्ये त्यांनी शशी कौशिक यांच्याशी लग्न केलं. मात्र त्यापूर्वी त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांना लग्नाची मागणी घातली होती. नीना गुप्ता प्रेग्नंट असताना सतीश कौशिक यांनी त्यांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. ‘सच कहूँ तो’ या आत्मचरित्रात नीना गुप्ता यांनी याविषयी खुलासा केला होता. माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये असताना नीना गरोदर राहिल्या होत्या. मात्र विवियन आधीच विवाहित असल्याने ते त्यांच्या पत्नीला सोडून नीना यांच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते. त्यावेळी गरोदर नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी लग्नाची मागणी घातली होती.

‘काळजी करू नकोस, जर बाळ सावळ्या रंगाचा जन्मला, तर ते माझं मूल आहे असं तू थेट म्हण. आपण दोघं लग्न करू, कोणाला कसलाच संशय येणार नाही’, असं ते नीना गुप्ता यांना म्हणाले होते. नीना यांनी त्यांच्या आत्मचरित्रात हा खुलासा केल्यानंतर त्यावर सतीश कौशिक यांनी प्रतिक्रियासुद्धा दिली होती. “मी तिचं नेहमीच कौतुक करतो. त्यावेळी लग्न न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय तिने घेतला होता. एका मित्राच्या नात्याने मी तिच्या पाठिशी खंबीर उभा राहिलो आणि तिला आत्मविश्वास दिला. मला तिची काळजी होती. कुठेतरी तिला एकटं वाटेल, याची मला सतत भीती होती. जेव्हा मी तिला लग्नाची मागणी घातली, तेव्हा ती खूप भावूक झाली होती. त्या दिवसापासून आमच्यातली मैत्री आणखी घट्ट झाली”, असं ते म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना गुप्ता यांनी मसाबाला जन्म दिला. मसाबा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नुकतंच तिने अभिनेता सत्यदीप मिश्राशी दुसरं लग्न केलं. या लग्नाला विवियन रिचर्ड्स यांनीसुद्धा हजेरी लावली होती. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.

एनसीआरमध्ये असताना सतीश कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्यांचं पार्थिव सध्या गुरुग्राममधील फोर्टीज रुग्णालयात आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचं पार्शिव मुंबईत आणलं जाईल. गुरुग्राममध्ये ते कोणाला तरी भेटण्यासाठी गेले होते, मात्र कारमध्येच त्यांना हार्ट अटॅक आला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.